लव्ह ट्रँगलमध्ये गेला बॉयफ्रेंडचा जीव

लव्ह ट्रँगलमध्ये गेला बॉयफ्रेंडचा जीव

बॉयफ्रेंडने दोन्ही प्रेयसींना भेटण्यासाठी सोमेश्वर बीचवर एकत्र भेटण्यासाठी बोलावले होते

वेब टीम मडकेरी : कर्नाटकात लव्ह ट्रँगलचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका तरुणाने आपल्या दोन प्रेयसींना दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सोमेश्वर बीचवर एकत्र भेटण्यासाठी बोलावले होते. मात्र त्यांच्यात वाद झाल्यानंतर एका प्रेयसीने समुद्रात उडी मारली. यानंतर तरुणानेही तिला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. यादरम्यान त्याची प्रेयसी वाचली, मात्र तो वाचू शकला नाही. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव लॉयड डिसोझा (२८) आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सोमेश्वर बीचवर ही घटना घडली. मृत्युमुखी पडलेला तरुण लॉयड इलियारपाडावू येथील रहिवासी होता. एकाच वेळी दोन मुलींसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. त्याने सोमेश्वर बीचवर चर्चेसाठी दोन्ही प्रेयसींना एकत्र बोलावले होते. मात्र या संवादादरम्यान त्याचा त्याच्या एका प्रेयसीसोबत वाद झाला. याचा राग येऊन प्रेयसीने समुद्रात उडी मारली. त्यावेळी समुद्रातील लाटा खूप उंच आणि धोकादायक होत्या. अशा स्थितीत त्याने प्रेयसीला वाचवले, पण तो स्वतःच बुडू लागला.

लॉयड पाण्यात अडकला आणि त्याचे डोके खडकावर आपटले. तरुणाला समुद्रात बुडताना पाहून आजूबाजूच्या लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. लॉयडला पाण्यातून बाहेर काढले आणि रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. लॉयड हा अबुधाबीमध्ये काम करायचा. करोना काळात तो आपल्या गावी आला होता. वर्षभरापासून तो आपल्या गावात राहत होता. यादरम्यान दोन मुलींना सोशल मीडियावर भेटल्यानंतर त्यांची त्यांच्याशी मैत्री झाली होती. त्याचवेळी दोन्ही मुलींसोबत त्याचे प्रेमसंबंध जुळले होते.

या घटनेची माहिती देताना मंगळुरू पोलीस आयुक्त म्हणाले की, तिघांमध्ये काही काळ प्रेमसंबंधावरून वाद झाला होता. अशा परिस्थितीत या तरुणाने प्रकरण शांत करण्याचा विचार केला. हा सर्व वाद त्याला कायमचा संपवायचा होता. यासाठी त्याने दोन्ही प्रेयसींना बीचवर एकत्र बोलावले होते. यादरम्यान प्रेयसीला वाचवताना त्याचा मृत्यू झाला. मुलीची प्रकृती ठीक असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments