तोतया पत्रकारावर गुन्हा दाखल!

 तोतया पत्रकारावर गुन्हा दाखल!

वेब टीम पाथर्डी : ‘मी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राचा पत्रकार आहे’. असे सांगून बनावट ओळखपत्र दाखवून पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण करून पोलिसांना अरेरावी करणाऱ्या एका तोतया पत्रकारावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी य तोतया पत्रकाराला दोन दिवसाची पोलीस कोठडी पाथर्डीच्या न्यायालयाने सुनावली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी, मंगळवार दुपारी तालुक्यातील सोमठाणे येथील युवक आकाश रामा दौंडे याने पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये येऊन मी पत्रकार आहे.

अशी खोटी बतावणी करून गावातील अवैद्य दारू विक्री बंद करण्याच्या मुद्दावरून पोलिसांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

त्यानुसार पोलिस दत्तात्रय भगवान बडदे यांच्या फिर्यादीवरून दौंडे याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

त्याला न्यायालयासमोर हजर केले असता दौंडे याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Post a Comment

0 Comments