भरदिवसा घरफोडी..... सात लाख ८० हजाराचा ऐवज लंपास

भरदिवसा घरफोडी..... सात लाख ८० हजाराचा ऐवज लंपास  

वेब टीम पाथर्डी : लेकीच्या लग्नासाठी जमा केलेले तिन लाख रुपये रोख व सोळा तोळे सोन्याचे दागीने असा सात लाख ८० हजार रुपयाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घराचे कुलुप तोडुन चोरुन नेल्याची घटना पाथर्डी तालुक्यात घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील भालगाव येथील आंबादास रघुनाथ वारे यांच्या मुलीचे लग्न आहे. त्यासाठी त्यांनी आवश्यक साहित्य जमा केले आहे.

वारे हे वस्तीवर राहतात.काही दिवसांवर लग्न आल्याने त्यांनी घरात तिन लाख रुपये तसेच सोन्याचे सोळा तोळ्याचे दागीने आणुन ठेवलेले होते.

वारे व त्यांची पत्नी घराला कुलुप लावुन शेतात पाणी देण्यासाठी सकाळी गेले व दुपारी चार वाजता परत घरी आले असता त्यांना घराच्या दरवाजाचे कुलुप तोडलेले दिसले.

त्यानंतर घरातील कपाटाचे कुलुपही तोडलेले दिसले. त्याचसोबत कपाटात ठेवलेले सर्व रोख रक्कम व दागिने देखील चोरट्यांनी चोरून नेले होते. याबाबत वारे यांच्या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments