पुण्यातही बुलीबाई ॲप सारखा प्रकार

 पुण्यातही बुलीबाई ॲप सारखा प्रकार 

वेब टीम पुणे : वस्ती मध्ये राहणाऱ्या महिला व मुलींचे फोटो काढते अश्लील स्वरूपात तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी खडकी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून न्यायालयाने त्याला 15 जानेवारीपर्यंत कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे याप्रकरणी पोलिसांनी 25 वर्षीय त रुणाला अटक केली आहे . याबाबत त्याच्या वस्तीमध्ये राहणार्‍या व्यक्तीने फिर्याद दिली आहे.  9 जानेवारी रोजी खडकी परिसरात ही घटना घडली.

      आरोपीने तो राहात असलेल्या परिसरातील महिला व अल्पवयीन मुलींचे फोटो व्हिडिओ स्वतःच्या मोबाईल मध्ये काढले.  त्यानंतर त्या फोटो आणि व्हिडिओ च्या स्वरूपात रूपांतर करून ते व्हायरल केले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.  या प्रकरणी त्या तरुणाला हजर केले असता हा 2019 पासून अशाप्रकारे फोटो आणि व्हिडिओ तयार करत आहे.  आरोपीने जप्त मोबाईल हँडसेट व इतर मोबाईलचा देखील वापर केला त्या तपास करायचा आहे.  त्याने वस्तीमधील महिला आणि मुलींचे मोबाईल मध्ये असलेले फोटो आणि व्हिडिओ तयार केले आहे . त्यात  18 वर्षाखालील चार मुली आणि तीन महिलांची नावे निष्पन्न झाली असून उर्वरित मुली महिलांबाबत तपास करायचा आहे.

आरोपीच्या व्हाट्सअप च्या यादीमधील ब्राझील पाकिस्तान हे असं या देशातील ग्रुप असून त्यावर अनेक अश्लील फोटो व्हिडिओ व्हायरल केले आहे त्याबाबत त्याच्याकडे तपास करण्यासाठी त्याचा आणखी कोणी साथीदार आहे का याचा तपास करण्यासाठी त्याला पोलिस कोठडी  देण्याची मागणी सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी केली. 

Post a Comment

0 Comments