जिल्ह्यात आज ४०८ कोरोना बाधितांची नोंद

जिल्ह्यात आज ४०८ कोरोना बाधितांची नोंद 


वेब टीम नगर : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. जिल्ह्यात आज 408 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. 10 जानेवारी रोजी जिल्ह्यात 244 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. आज नोंद झालेल्या रुग्णांमध्ये अहमदनगर शहरात सर्वात जास्त 126 रुग्णांची नोंद झाली आहे.त्यामुळे कोरोना प्रतिबंधक निर्बंध आणखीन कठोर करण्यात आले असून अनेक चौकातून नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे.   

आज नोंद झालेल्या 408 नवीन कोरोनाबाधित रुग्णांमध्ये अहमदनगर शहर 126, राहता 48, इतर जिल्ह्यातील 41 ,नगर ग्रामीण 39 ,श्रीरामपूर 18 ,अकोले 17, पारनेर 17, कोपरगाव 16, संगमनेर 15 ,शेवगाव 15 ,जामखेड 10 श्रीगोंदा 9, मिलिटरी हॉस्पिटल 08, पाथर्डी 8 कर्जत 05,इतर राज्यातील 04, राहुरी 04 ,भिंगार कॅन्टोमेंट 04, आणि नेवासा मधील 4 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद आहे.

कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे .  

Post a Comment

0 Comments