पत्नींची अदलाबदली करणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पत्नींची अदलाबदली करणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

वेब टीम एर्नाकुलम : केरळ पोलिसांनी सेक्ससाठी भागीदारांची देवाणघेवाण करणाऱ्या रॅकेटशी संबंधित सात जणांना अटक केली. रविवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. यात एक हजार जोडप्यांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. एका महिलेने तिच्या पतीविरुद्ध करुकाचल पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर ही अटक करण्यात आली आहे, जो तिला इतर पुरुषांशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होता. याआधी कायमकुलम भागातही अशाच घटना घडल्या होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या ग्रुपने सोशल नेटवर्किंग साइट्सचा वापर राज्यभरात केला होता. सुरुवातीला ते टेलिग्राम आणि मेसेंजर ग्रुपमध्ये सामील होतात. अशा प्रकारे ते एकमेकांशी जोडले जातात. तक्रार करणाऱ्या महिलेच्या पतीला आम्ही अटक केली आहे. यामागे एक मोठा गट आहे आणि आम्ही या प्रकरणाशी संबंधित आणखी लोकांना शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, असे चांगनचेरी डीवायएसपी आर श्रीकुमार यांनी सांगितले.

आरोपी अलप्पुझा, कोट्टायम आणि एर्नाकुलम जिल्ह्यातील आहेत. पोलिसांनी पुष्टी केली की राज्यभरातील लोक आणि उच्चभ्रू वर्तुळातील लोक या रॅकेटचा भाग आहेत. आता २५ जणांकडे पोलिसांचं लक्ष असून येत्या काही दिवसांत आणखी अटक होण्याची शक्यता आहे. या रॅकेटच्या सोशल मीडिया ग्रुप्समध्ये १,००० हून अधिक सदस्य असल्याचा संशय आहे.

Post a Comment

0 Comments