पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न 

वेब टीम नगर : यापूर्वीही खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. पोलीस असून देखील सुद्धा मला किती त्रास देणार? असा सवाल करत पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर पोलीस ठाण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याने अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये  स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

 दरम्यान या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांमुळे तसेच शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित कातकाडे यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.जितेंद्र उर्फ हरिभाऊ मांडगे (वय 35, राहणार पिंपरी गवळी, तालुका पारनेर, जिल्हा नगर) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याचे नाव आहे. तो पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथे पोलीस हवालदार पदावर कार्यरत आहे. जितेंद्र याच्यावर सुपा पोलिस ठाण्यामध्ये दोन गुन्हे त्याच्या पत्नीने दाखल केलेले आहे. एक गुन्हा 2018 साली दाखल करण्यात आला असून त्याच्यावर कलम 307 तसेच 498 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमध्ये त्याची बायकोच फिर्यादी आहे. त्याच्या बायकोचे व त्याचे सातत्याने वाद होते. तसेच त्या दोघांचे न पटल्यामुळे न्यायालयामध्ये त्यांचा घटस्फोटाचा दावा सध्या सुरू आहे. 7 जानेवारी 2022 रोजी पुन्हा त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. सदरचे गुन्हे खोटे असून  स्थानिक पोलिस मला या संदर्भामध्ये त्रास देत आहेत, त्याला मी कंटाळलो आहे, असे तो यावेळी सांगत होता.

 त्याने आज नगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये सायंकाळच्या सुमारास रॉकेल घेऊन प्रवेश केला. एका अधिकाऱ्याच्या दालनात गेल्यानंतर त्याने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूला असलेल्या पोलिसांनी त्याला तात्काळ अटकाव केला व त्याला बाजूला नेले. जितेंद्र याने माझ्यावर अन्याय झाला आहे असे म्हणत  आरडाओरड सुरू केली. नगर शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जितेंद्र याची समजूत काढून त्याला भिंगार पोलिसांच्या हवाली केले. या संदर्भामध्ये भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी  आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा  भादवि कलम ३०९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.(फोटो -आत्मदहन )

Post a Comment

0 Comments