डेल्टा,ऑमिक्रोन पेक्षाही धोकादायक नीओकोव्ह

 डेल्टा,ऑमिक्रोन पेक्षाही धोकादायक नीओकोव्ह


 वुहानच्या शास्त्रज्ञांनी दिला इशारा; तीन बाधितांपैकी एकाचा होतोय मृत्यू

वेब टीम बीजिंग : जिथं करोनाचा पहिला रुग्ण आढळून आला त्या चीनमधल्या वुहान इथल्या शास्त्रज्ञांनी आता करोनाच्या एका नव्या प्रकाराबद्दलचा इशारा दिला आहे. निओकोव्ह कोरोनाचा नवा प्रकार धोकादायक असून या प्रकारामध्ये मृत्यूदर आणि अधिक असल्याचं या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव मध्य पूर्वीय देशांमध्ये २०१२ आणि २०१५ मध्ये दिसून आल्याचीही माहिती मिळत आहेत.

हा नवा निओकोव्ह (MERS-CoV) हा कोविड-१९(SARS-CoV-2) सारखाच आहे. हा विषाणू दक्षिण आफ्रिकेतल्या वटवाघुळांमध्ये आढळून आला होता. तो केवळ प्राण्यांमध्येच पसरणारा असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र bioRxivया वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या अभ्यासातून हे समोर आलं आहे की हा विषाणू माणसांमध्येही संक्रमित होऊ शकतो.

वुहान विद्यापीठ आणि चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सस् इन्स्टिट्यूट ऑफ बायोफिजीक्स इथल्या संशोधकांच्या मते, या विषाणूला मानवी पेशीमध्ये अतिक्रमण करण्यासाठी केवळ एक म्युटेशन करावं लागत आहेत. संशोधनाच्या निष्कर्षांमध्ये असे म्हटले आहे की ह्या नव्या करोना विषाणूपासून धोका आहे कारण तो ACE2 रिसेप्टरला करोनाव्हायरस रोगजनकापेक्षा वेगळ्या पद्धतीने बांधतो. परिणामी, श्वासोच्छवासाचे आजार असलेल्या किंवा लसीकरण झालेल्या लोकांद्वारे तयार केलेले अँटीबॉडीज किंवा प्रथिनांचे रेणू NeoCoV विरुद्ध संरक्षण करू शकत नाहीत.

चिनी संशोधकांच्या मते, NeoCoV चा मृत्यूदर अधिक आहे. प्रत्येक तीन संक्रमित व्यक्तींपैकी एकाचा मृत्यू होतो आणि सध्याचा SARS-CoV-2 करोना विषाणूचा प्रसाराचा दर अधिक आहे. NeoCoV वरील ब्रीफिंगनंतर, रशियन स्टेट व्हायरोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरच्या तज्ञांनी गुरुवारी एक निवेदन जारी केले, असे अहवालात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments