डॉक्टरकडून १० लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन शिक्षकांसह संस्थाचालक ,राजकीय पदाधिकाऱयांचा सहभाग

डॉक्टरकडून १० लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन शिक्षकांसह संस्थाचालक ,राजकीय पदाधिकाऱयांचा सहभाग 

वेब टीम पाथर्डी : कोविड हॉस्पिटल चालवणाऱ्या डॉक्टरला त्यांच्या हॉस्पिटलची बदनामी थांबवण्यासाठी १० लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन माध्यमिक शिक्षक, एक शिक्षणसंस्था संस्थाचालक व एक राजकीय पदाधिकारी अशा चौघा आरोपी विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि फिर्यादी डॉ. विनोद त्रिंबक गर्जे यांनी पाथर्डी शहरात कोविड हॉस्पिटल चालवण्या संदर्भात रीतसर परवाना घेतलेला असून सर्व प्रशासकीय माहिती पंचायत कार्यालयात सादर केलेली आहे, अशी परिस्थिती असतांना शैलेंद्र जायभाय याने डॉ. नवनाथ आव्हाड, अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी यांचे कडे माहिती अधिकारा अंतर्गत गर्जे हॉस्पिटलची माहिती मागवली होती.

सदरील माहिती डॉ. गर्जे यांनी परस्पर जायभाय यास कळवण्यास लेखी पत्राने सांगितले होते. परंतु शैलेंद्र जायभाय व नवनाथ उगलमुगले यांनी डॉ. गर्जे यांना डॉ. आव्हाड यांचे समोर दिनांक १४ जानेवारी रोजी १० लाखांची खंडणी मागितली व रक्कम न् दिल्यास पेपरमध्ये हॉस्पिटलच्या बातम्या देवून बदनामी करत हॉस्पिटल बंद पडण्याची धमकी दिली होती

त्यानंतर डॉ. विनोद गर्जे हे खरवंडी येथे कार्यक्रमानिमित्त २५ जानेवारी रोजी गेली असता मिथुन डोंगरे यांने मध्यस्थी करत बदनामी टाळण्यासाठी तडजोडी करत पुन्हा चार लाखांची खंडणी मागितली. तडजोडीअंती तीन लाख खंडणी देण्याचे ठरले.

पंचासमक्ष शैलेंद्र प्रल्हाद जायभाये (रा. खरवंडी ता.पाथर्डी), मिथुन दगडू डोंगरे (रा.जवळवाडी ता.पाथर्डी), मच्छिन्द्र राधाकिसन आठरे (रा.शआनंदनगर,पाथर्डी) यांना खंडणीची रक्कम स्वीकारताना पोलीस पथकाने तनपुरवाडी शिवारात छापा टाकून रंगेहात पकडले.

पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी शैलेंद्र जायभाय व मिथुन डोंगरे हे वॅग्नोर गाडीतून पळून गेले. परंतु आरोपी मच्छिद्र राधाकिसन आठरे यास पोलिसांना पकडण्यात यश आले.

असून शैलेंद्र प्रल्हाद जायभाये ( रा. खरवंडी ता. पाथर्डी), मिथुन दगडू डोंगरे (रा. जवळवाडी ता.पाथर्डी) , नवनाथ उगलमुगले (रा. काटेवाडी ता.पाथर्डी), मछीन्द्र राधाकिसन आठरे (रा. आनंदनगर,पाथर्डी) यांच्या विरुद्ध खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीमध्ये माध्यमिक शिक्षक, शिक्षणसंस्था संस्थाचालक,राजकीय पदाधिकारी यांचा समावेश असल्याचे उघड झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments