जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक 

वेब टीम नगर : अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाचा उद्रेक  झाला असून , आज  तब्बल 847  इतके रुग्ण वाढले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – 

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे – संगमनेर -27, अकोले -62, राहुरी – 29, श्रीरामपूर -52, नगर शहर मनपा -280, पारनेर -28 ,पाथर्डी -23, नगर ग्रामीण -48, नेवासा -17, कर्जत – 3, राहाता -109, श्रीगोंदा -26, कोपरगाव -36, शेवगाव -3, जामखेड -9, भिंगार छावणी मंडळ -47, इतर जिल्हा -34, मिलिटरी हॉस्पिटल -8, इतर राज्य -6,एकूण - 847

दरम्यान कोरोना नियंत्रणासाठी लसीकरणासह विविध उपाय योजना राबवणाऱ्या कोविड योद्ध्यांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याने चिंता वाढली आहे. मनपाच्या आरोग्य विभागातील सुमारे १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.

त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर कमी मनुष्यबळात काम करण्याचा ताण वाढला आहे. कोरोनाच्या नियंत्रणासाठी मनपा आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा थेट रुग्णांशी संपर्क येतो.

या यंत्रणेत स्वॅब घेणारे, डाटा एन्ट्री, ऑपरेटर, वैद्यकीय अधिकारी जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहेत. दरम्यान, मनपातील १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून समजली.त्यामुळे चिंता वाढली आहे. बाधित कर्मचाऱ्यांच्या कामाचा अतिरिक्त भार इतर कर्मचाऱ्यांवर आला आहे. दरम्यान, शहरातील नागरिकांना

आतापर्यंत ४ लाख ४९ हजार ४८४ डोस दिले आहेत. त्यापैकी २ लाख ६४ हजार ८६० नागरिकांनी पहिला तर १ लाख ८६ हजार ४४३ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.

Post a Comment

0 Comments