ओमायक्रोन नंतरच्या व्हेरिएंट्स साठी तयार रहा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

ओमायक्रोन नंतरच्या व्हेरिएंट्स साठी तयार रहा : पंतप्रधान नरेंद्र मोदी 

वेब टीम नवी दिल्ली : देशातील सध्याच्या कोविड-१९ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदींची या वर्षातील मुख्यमंत्र्यांसोबतची ही पहिलीच बैठक आहे. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांना सध्या सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेला बळकटी देण्यास सांगितले. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी, ओमायक्रॉननंतर दुसऱ्या कोविड प्रकारासाठीही तयार राहा, असे म्हटले आहे.

पंतप्रधानांसोबतच्या आभासी बैठकीत गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, काँग्रेसशासित राज्याचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हेही उपस्थित होते. तसेच महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे या बैठकीसाठी उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना परिस्थितीवर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत भाष्य केले. “ओमाक्रॉनचा प्रसार पूर्वीच्या प्रकारांपेक्षा वेगाने होत आहे, तो अधिक प्रसारित होत आहे. आपले आरोग्य तज्ञ परिस्थितीचे मूल्यांकन करत आहेत. स्पष्टपणे आम्ही सतर्क आहोत. राहावे लागेल. शंभर वर्षांतील सर्वात मोठ्या महामारीविरुद्धचा भारताचा लढा आता तिसर्यां वर्षात दाखल झाला आहे. कठोर परिश्रम हाच आमचा एकमेव मार्ग आहे आणि विजय हाच एकमेव पर्याय आहे. आम्ही १३० कोटी भारतीय आमच्या प्रयत्नांनी नक्कीच करोनावर विजय मिळवू,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

“आपली तयारी कोविडच्या सर्व प्रकारांपेक्षा पुढे असली पाहिजे. आपण ओमायक्रॉनवर विजय मिळवल्यानंतर, आपल्याला व्हायरसच्या इतर प्रकारांशी लढण्यासाठी देखील तयारी करावी लागेल. आणि यामध्ये राज्ये एकमेकांना सहकार्य करतील,” असे पंतप्रधान म्हणाले.

“आता आपल्याला दोन वर्षांचा साथीच्या रोगाशी लढण्याचा अनुभव आहे. कोणतीही कारवाई करण्यापूर्वी लोकांच्या रोजगाराचा प्रश्न लक्षात ठेवला पाहिजे. त्यामुळे, स्थानिक नियंत्रणाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. जास्तीत जास्त लोकांना उपचार मिळतील याचीही काळजी घेतली पाहिजे, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी नाईट कर्फ्यू आणि वीकेंड कर्फ्यू जाहीर केला आहे.

“पूर्वी अस्तित्त्वात असलेल्या ओमाक्रॉनबद्दलची शंका हळूहळू दूर होत आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंट पूर्वीच्या व्हेरियंटपेक्षा कितीतरी पटीने अधिक वेगाने सामान्य लोकांना संक्रमित करत आहे. मात्र आज भारताने कोविड लसीचा पहिला डोस सुमारे ९२ टक्के प्रौढ लोकसंख्येला दिला आहे. दुसऱ्या डोसच्या कव्हरेजमध्येही देश ७० टक्क्यांच्या आसपास पोहोचला आहे. १० दिवसांत भारतानेही सुमारे ७० टक्के बालकांचे लसीकरण केले आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.

Post a Comment

0 Comments