नगर शहरात कोरोना बाधितांच्या संख्येची वाढती कमान

नगर शहरात कोरोना बाधितांच्या संख्येची वाढती कमान 

वेब टीम नगर : अहमदनगर जिल्ह्यातील कोटोन बाधितांच्या संख्येची वाढती कमान कायम असून शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येचा विस्फोट झाला आहे. गेल्या २४ तासात नगर शहरात सुमारे १९४ जणांना कोरोना चा संसर्ग झाला तर जिल्ह्याची संख्या ५५७ च्या  घरात पोहोचली आहे. 

 गेल्या ९ दिवसात शहरातील ८१३ जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. मात्र रुग्ण संख्या जरी वाढत असली तरी रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. 

आज कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या अहमदनगर शहर १९४, राहते ४५,संगमनेर १४,श्रीरामपूर २२, नेवासे १४,नगर तालुका ३३,पाथर्डी १२,अकोले १०,कोपरगाव २५,कर्जत ०४,पारनेर ०८, राहुरी १६,भिंगार शहर ०५,शेवगाव ११,जामखेड ०४, श्रीगोंदे २१,इतर जिल्ह्यातील २३,इतर राज्यातील २६, मिलिटरी हॉस्पिटल ४२ , एकूण ५५७ अशी असून प्रशासकीय यंत्रणेकडून कोरोना प्रतिबंध साठी पुरेपूर प्रयत्न केले जात असुन नागरिकांना मास्क वापरण्याचे , सामाजिक अंतरपालनाचे आवाहन करण्यात आले आहे.   

Post a Comment

0 Comments