गुंगीचे औषध देऊन १७ विध्यार्थीनींचा विनयभंग
वेब टीम नवी दिल्ली : देशात अनेक धक्कादायक घटना घडतात. त्याच दरम्यान माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे . उत्तर प्रदेशात मुजफ्फरनगरमध्ये गुंगीचे औषध देत 17 मुलींचं लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना घडली आहे . शाळेच्या मुख्याध्यापकाने परीक्षेच्या बहाण्याने बोलावून विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे .
मुख्याध्यापकाने दहावीत असलेल्या 17 विद्यार्थिनींना प्रॅक्टिकल परीक्षेचा बहाणा करून शाळेतच थांबण्यास सांगितले. त्यानंतर त्यांच्या जेवणात गुंगीचे औषध मिसळलं आणि सहकार्यांबरोबर मिळून लैंगिक शोषण केलं असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आरोपीना पकडण्यासाठी टीम तयार करण्यात आल्या आहेत. योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
या घटनेचे परिसरात एकच खळबळ उडाली आहे विद्यार्थिनींच्या पालकांनी स्थानिक आमदार प्रमोद उत्तवाल यांच्याकडे मदत मागितली असता त्यांनी वरिष्ठ पोलीस अधीक्षक अभिषेक यादव यांच्याशी संपर्क साधत चौकशी करण्यास सांगितलं . तोपर्यंत मुलींच्या कुटुंबाने वारंवार पोलिस तक्रार दाखल करण्याचे प्रयत्न केले होते ,पण त्यांना मदत मिळत नव्हती असा या कुटुंबीयांनी दावा केला आहे . तक्रारदार मुलीने दिलेल्या माहितीनुसार मुख्याध्यापक योगेश यांनी परीक्षेच्या बहाण्याने सोळा ते सतरा मुलींना बोलावून घेतलं . आम्हाला लिहायचं असल्याचे सांगत रात्री शाळेतच थांबण्यास सांगण्यात आलं. दुसऱ्या दिवशी अजूनही प्रॅक्टिकल असतील असं सांगण्यात आलं . यावेळी मुलींनी खिचडी बनवली असता ती नीट शिजली नसल्याचं मुख्याध्यापक म्हणाले. त्यानंतर त्यांनी स्वतः बनवली आणि आम्हाला खिचडी खायला दिली. खिचडी खात असतांना आम्ही बेशुद्ध पडलो आणि त्यानंतर आमचा विनयभंग करण्यात आला .
पोलिसांनी याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक जिथे विद्यार्थ्यांना शिकवतात आणि प्रॅक्टिकल परीक्षेच्या बहाण्याने ज्या शाळेत नेले त्या मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. यामधील एकाला अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पाच पथके तयार करण्यात आली आहेत. याप्रकरणी तक्रार दाखल करून न घेणाऱ्या अधिकार्यांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
0 Comments