बाळ बोठेवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करावी : रुणाल जरे

बाळ बोठेवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करावी : रुणाल जरे  

वेब टीम नगर : रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे.

म्हणून बोठे याच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई दाखल व्हावी अशी मागणी रुणाल जरे यांनी पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दरम्यान या निवेदनात रुणाल जरे यांनी, म्हंटले आहे कि, आरोपी बोठे याचा गत दहा वर्षांचा इतिहास पाहता त्याच्या विरोधात हप्ता वसुली, खंडणी वसुली, अपहरण, सुपारी देणे, खून असे संघटित गुन्हेगारीचा लेखाजोखा आहे.

आरोपीवर मोक्का नियमानुसार दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल आणि प्रलंबित आहे, तसेच आरोपी बोठे विरोधात सुपा,पारनेर,कोतवाली, तोफखाना, राहुरी या ठिकाणी गुन्हे दाखल आणि प्रक्रियेत असल्याचे जरे यांनी म्हणले आहे.

आरोपीवर गंभीर गुन्हे असले तरी राजकीय वरदहस्त वापरल्याने त्याच्यावर गंभीर कारवाई झालेली नव्हती ती केली जावी असे निवेदनात म्हंटले आहे.दरम्यान बाळबोटेच्या जामीन अर्जावर बाजू मांडण्यासाठीच १५ डिसेंबर रोजी सुनावणी होती मात्र  काही कारणामुळे टी सुनावणी होऊ शकली नाही.  

Post a Comment

0 Comments