मोटारसायकलवर लिफ्ट देणे पडले महागात..!

मोटारसायकलवर लिफ्ट देणे पडले महागात..!

वेब टीम नगर : रस्त्याने मोटारसायकलवरून जात असतानाच पायी चालत असलेल्या एकास त्याने लिफ्ट दिली मात्र ही गोष्ट त्याला चांगलीच महागात पडली.तो मोटारसायकलचालक लघूशंका करण्यासाठी थांबला मात्र यावेळी भामट्याने त्याची मोटारसायकलच चोरून नेली. ही घटना कर्जत तालुक्यातील माहीजळगाव शिवारात घडली. 

याप्रकरणी गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जत पोलिस ठाण्यात विकास गागरे (रा.निमगाव डाकू)याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

गायकवाड हे करमाळा येथून धुळ्याकडे मोटारसायकलवरुन जात होते. रस्त्यात एका इसमाला त्यांनी लिफ्ट दिली. माहीजळगाव शिवारात ते दोघे लघूशंका करण्यासाठी थांबले. परंतु या काळात संबंधित इसमाने गायकवाड यांची मोटारसायकल घेवून पोबारा केला.





Post a Comment

0 Comments