अब्रूनुकसानीच्या दाव्यात चित्रा वाघ यांचे न्यायालयात शपथ पत्र

अब्रूनुकसानीच्या  दाव्यात चित्रा वाघ यांचे न्यायालयात शपथ पत्र 

वेब टीम बीड :  बलात्कारी म्हणून उल्लेख करून बदनामी केल्याच्या कधीच वक्तव्यावर आक्षेप घेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब  शेख यांनी भाजप महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या विरुद्ध बीड येथील न्यायालयात 50 लाख रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. 

21 डिसेंबर रोजी त्यावर सुनावणी होणार असून 20 डिसेंबर रोजी चित्रा वाघ यांनी येथील न्यायालयात शपथपत्र दाखल केले शिरूर कासार येथील तरुण सराफ व्यापारी विशाल कुलथे  याची मे 2021 मध्ये हत्या झाली होती त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी भाजप नेत्या चित्रा वाघ 18-7-2019 शिरूर कासार येथे आल्या  होत्या. 

 त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता राष्ट्रवादी  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांचे शिरूर कासार हे गाव  आहे तेथे त्यांनी मेहबूब शेख यांच्यावरही प्रहार केला होता.  बलात्कारी असा उल्लेख करून टीका केल्याचा आरोप करत मेहबूब शेख यांनी चारित्र्यहनन केले म्हणून शिरूर ठाण्यात चित्राबाई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.  दरम्यान कथित वक्तव्याच्या आधारे मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्या विरुद्ध बीड न्यायालयात 50 लाख रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता.  त्या संदर्भात यापूर्वी झालेल्या न्यायालयीन प्रक्रियेला न्यायालयात आल्या होत्या. 

आता  21 डिसेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.  या पार्श्वभूमीवर 20 डिसेंबर रोजी चित्रा वाघ यांनी न्यायालयात येऊन शपथपत्र दाखल केले.  चित्राबाई यांच्या वतीने ज्येष्ठ वकील बाळासाहेब कोल्हे हे आज दिनांक 21 रोजी बाजू मांडणार आहेत.  या प्रकरणाची सुनावणी सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर)  फडे यांच्यासमोर सुरू आ. हे मेहबूब शेख यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या अत्याचाराचे गुन्हे हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचे कारण नाही असे शपथपत्रात नमूद आहे शपथ पत्र संदर्भात सर्व त्या कायदेशीर बाबी चित्रा वाघ यांनी न्यायालयात येऊन पूर्ण केल्या जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांच्यासह पदाधिकारी त्यांच्या समवेत होते. 

Post a Comment

0 Comments