बाळ बोठेच्या जामिन अर्जावर १५ डिसेंबर रोजी सुनावणी

बाळ बोठेच्या जामिन अर्जावर १५ डिसेंबर रोजी सुनावणी 

वेब टीम नगर :  जिल्ह्यातील गाजलेले  रेखा जरे हत्याकांड प्रकरणी हायकोर्टात दाखल झालेल्या जामीन अर्जावर न्या. शेवलीकर यांनी सुनावणीसाठी १५ डिसेंबर ही तारीख दिली असून त्यावेळी फिर्यादीच्यावतीने म्हणणे सादर करण्यात येणार आहे. 

दरम्यान रेखा  जरे यांचे पुत्र रुणाल जरे यांनी पोलीस अधीक्षकांकडे आपल्या जीविताला धोका निर्माण असल्याबाबत तक्रार केली आहे.रुणाल जरे यांनी मंगळवारी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 25 नोव्हेंबर रोजी दिल्ली गेट परिसरात एका व्यक्तीने रस्त्यात माझी गाडी अडवून मला धमकी दिली,यासंदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात मी तक्रार देखील नोंदवली आहे. माझ्या आईची हत्या एक वर्षांपूर्वी झालेली असून या घटनेने आमचे कुटुंब खचुन गेले आहे.

पाळत ठेवणारे व्यक्ती माझ्या आईप्रमाणे माझा देखील खून करतील अशी भीती मला व माझ्या कुटुंबियांना आहे. आमच्यावर पाळत ठेवणारे आरोपीचे नातेवाईक आहेत की मित्र किंवा इतर कोणी याबाबत आपण योग्य ती चौकशी करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आलेले आहे.

Post a Comment

0 Comments