जिल्हयातील लोकअदालत मध्ये ५० कोटी १४ लाख रुपयांची वसुली

जिल्हयातील लोकअदालत मध्ये ५० कोटी १४ लाख रुपयांची वसुली

वेब टीम नगर : अहमदनगर बार असोशिएशन व सेंट्रल बार असोशिएशन यांचे संयुक्त विदयमाने शनिवार, ११ डिसेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन अहमदनगर जिल्हा न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालय येथे करण्यात आले होते . यात ९४८९० प्रकरणे ठेवण्यात आली होती.यापैकी १७५१३ प्रकरणे तडजोडीने निकाली काढत ५० कोटी १४ लाख रूपयांची वसूली करण्यात आली. सर्वाधिक प्रकरणे निकाली काढणे व वसुलीत अहमदनगर जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर बार असोशिएशन व सेंट्रल बार असोशिएशन यांचे संयुक्त विदयमाने शनिवार, ११ डिसेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन अहमदनगर जिल्हा न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालय येथे करण्यात आले.

राष्ट्रीय लोकअदालती मध्ये अहमदनगर जिल्हयामध्ये सर्व न्यायालयांतील दिवाणी, फौजदारी, एन. आय. अॅक्ट , बँकेची कर्ज वसुली , मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई , कामगार न्यायालयांतील ,कौटुंबिक वादाची , महावितरणाची समझोता योग्य तसेच न्यायालयांत येण्या अगोदरचे दाखलपूर्व प्रकरणे, आपसी समझोत्याकरीता ठेवण्यात आली होती.

अहमदनगर जिल्हयामध्ये १५०२१ दाखलपूर्व प्रकरणे मिटविण्यात आली. तर २४६८ प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला तसेच ५० कोटी, १४ लाख २५ हजार ३११ रकमेची वसुली करण्यात आली. अहमदनगर जिल्हयातील सर्व न्यायालयांत हे लोकन्यायालय आयाजित करण्यात आले होते.

Post a Comment

0 Comments