सी डी एस बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात

सी डी एस बिपीन रावत यांच्या  हेलिकॉप्टरला अपघात 

सी डी एस बिपिन रावत यांच्यासह १३ जण कालवश  ;लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश 

वेब टीम कुन्नूर : तामिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले.याभीषण अपघाताने  भारताचे सी डी एस बिपीन रावत यांच्यासह अन्य तेरा जणांना  मृत्यूने गाठले .  एएनआयच्या वृत्तानुसार .  त्यांचे कुटुंबीयही हेलिकॉप्टरमध्ये होते.  बिपिन रावत एका व्याख्यानमालेत सहभागी होणार होते.

तामिळनाडूच्याएएनआयच्या वृत्तानुसार, तामिळनाडूत कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना झाली. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत आणि त्यांचे कुटुंबीय या Mi- 17V5 हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर त्याला आग लागली. घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आलं मात्र अपघात झालेलं ठिकाण डोंगराळ भागामध्ये असल्याने तिथे पोहचण्यास अडचणी येत होत्या .

मिळालेल्या माहितीनुसार स्थानिकांनी ८० टक्के भाजलेले दोन मृतदेह स्थानिक रुग्णालयात नेले. अपघाताच्या ठिकाणी उतारावर काही मृतदेह दिसत  होते . मृतदेह बाहेर काढण्यासाठी आणि ओळख तपासण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

या हेलिकॉप्टरमधून एकूण १४ जण प्रवास होते. यामध्ये बिपीन रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नीदेखील हेलिकॉप्टरमध्ये होत्या .  सीडीएस जनरल बिपीन रावत यांचाही समावेश आहे. रावत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नायक गुरसेवक सिंग, नायक जितेंद्र कुमार, लान्स नायक विवेक कुमार, लान्स नायक बी साई तेजा, हवालदार सतपाल यांची नावं समोर आली आहेत .

भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टर अपघाताच्या ठिकाणावरील मोठ्या प्रमाणावर आग लागल्याचे आणि स्थानिक लोक तात्काळ बचाव कार्यात मदत करत असल्याचे दिसून आले. अनेक पथके शोध आणि बचाव कार्य करत होते . उशिरा हाती आलेल्या वृत्तानुसार एकूण १३ मृतदेह हाती लागले आहेत  वायुदलाच्या वतीने त्याला दुजोरा दिलेला आहे .या सर्व मृत देहांची डी एन ए चाचणी केली जाणार आहे. 

Post a Comment

0 Comments