पुण्यात भरदिवसा गोळीबार ; काँग्रेस पदाधिकाऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू!

पुण्यात भरदिवसा गोळीबार ; काँग्रेस पदाधिकाऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू!

पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर घडला थरार

वेब टीम पुणे : पुण्यातील भारती पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर भरदिवसा एका तरुणावर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या गोळीबारात त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. समीर मुनीर शेख असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून, तो काँग्रेसचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास समीर हा भारती पोलीस चौकीपासून काही अंतरावर असलेल्या एका हॉटेलजवळ थांबला होता. त्यावेळी दुचाकीवरून तिघेजण आले. त्यातील एकाने पिस्तूलमधून समीरवर गोळ्या झाडल्या. त्यामध्ये समीरखाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

या हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले आहेत. तर या हत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही. हत्या झालेला तरूण काँग्रेस पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे, असे भारती विद्यापीठ पोलिसांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments