“गोडसे मुर्दाबाद म्हणून दाखवा,” कन्हैय्या कुमारने राम कदमांना दिलं आव्हान

“गोडसे मुर्दाबाद म्हणून दाखवा,” कन्हैय्या कुमारने  राम कदमांना दिलं आव्हान

वेब टीम नवी दिल्ली  : ‘भारत माता की जय’ म्हणून दाखवा म्हणणाऱ्या भाजपा आमदार राम कदम यांना काँग्रेस नेता कन्हैय्या कुमारने स्टेजवरच ‘गोडसे मुर्दाबाद’ बोलण्याचं आव्हान दिलं आणि यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरु झाली. न्यूज १८ च्या चौपाल या कार्यक्रमात सहभागी झालेले दोन्ही नेते मंचावर असतानाच चर्चेदरम्यान एकमेकांना आव्हान देऊ लागले. यावेळी कन्हैय्या कुमारने आव्हान पूर्ण केलं, मात्र राम कदम शेवटपर्यंत गोडसे मुर्दाबाद बोलले नाहीत. अभिनेत्री स्वरा भास्करनेही यावरुन चिमटा काढत ट्वीट केलं आहे.

मंचावर असताना राम कदम यांनी कन्हैय्या कुमारला ‘भारत माता की जय बोलता का?’, एकदा बोलून दाखवा…असं आव्हान देत एका जुन्या वक्तव्याची आठवण करुन दिली. “तुम्ही १० फेब्रुवारी २०१६ मध्ये म्हटलं होतं की, “माझ्या मुलाचं नाव भारत माता की जय ठेवेन, जेणेकरुन तो शाळेत गेल्यावर फी माफ करतील”.

यानंतर कन्हैय्या कुमारने राम कदम यांना थांबवत तुम्ही माझ्यामधला बिहारी जागा केला आहे असं सांगत उत्तर देण्यास सुरुवात केली. “आतापर्यंत मी यांच्याशी आदराने बोलत होतो, आता यांनी माझ्यामधला बिहारी जागा केला आहे.आम्ही भारत माता की जय बोलतो…पण मग तुम्ही गांधींना मानत असाल तर गोडसे मुर्दाबाद बोलून दाखवा,” असं आव्हानच कन्हैय्या कुमारने यावेळी दिलं.

यावर राम कदम यांनी आम्ही गोडसेच्या कार्याचं आम्ही कधी समर्थन केलं आहे का? असा प्रश्न विचारला. यावर कन्हैय्या कुमारने केलं आहे असं उत्तर देत आरएसएसच्या कार्यालयात गोडसेचा फोटो लावला आहे, ग्वालियरमध्ये मंदिर उभारलं आहे असं सांगितलं.

राम कदम पुढे बोलताना म्हणाले की, “तुम्ही गोडसे मुर्दाबाद बोला असं सांगत आहात, पण आम्ही गोडसे जिंदाबाद असं कधी म्हटलं?. गांधींच्या विचारसऱणीचा अपमान आम्ही कधी केला?”. यावर कन्हैय्याने नेहमीच असं सांगत असहमती दर्शवली आणि पुन्हा एकदा ‘गोडसे मुर्दाबाद’ बोलण्याचं आव्हान दिलं.

त्यावर राम कदमांनी पुन्हा एकदा आम्ही गोडसे जिंदाबादच म्हणत नाही तर मुर्दाबाद बोलण्याचा प्रश्न कुठून येतो असं म्हटलं. त्यावर कन्हैय्या कुमारने का घाबरत आहात?पक्षातून बाहेर काढतील अशी भीती वाटतीये का? असा टोलाही लगावला.

. यानंतर राम कदम यांनी मी कोणत्या शब्दांत बोलावं हे माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे असं सांगताच कन्हैय्या कुमारने त्याचप्रमाणे ‘जय श्रीराम’, ‘भारत माता की जय’ म्हणणं माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, मला बोलायला सांगणारे तुम्ही कोण? तुम्ही सांगितल्यावर मी का बोलावं? अशी विचारणा केली.

Post a Comment

0 Comments