जन्माला घातले म्हणून आईच्या डॉक्टर विरोधात खटला

जन्माला घातले म्हणून आईच्या डॉक्टर विरोधात खटला 

वेब टीम लंडन : आई-बाबांशी अनेकदा भांडताना आपल्यापैकी बरेच जण असं म्हटले असतील की, मला जन्मालाच का घातलं? पण ते तेवढ्यापुरतंच असतं. आपल्यापैकी कदाचित कोणी ती गोष्ट लावून धरली नसेल. पण या मुलीने मात्र ही गोष्ट जास्तच मनाला लावून घेतली आणि चक्क आपल्या जन्माच्या वेळी आईची प्रसुती केलेल्या डॉक्टरलाच कोर्टात खेचलं. पण विशेष गोष्ट ही की ती मुलगी ही केस जिंकलीसुद्धा. वरवर पाहता ही गंमत वाटत असली तरी त्याचं कारण मात्र गंभीर आहे.

२० वर्षीय इव्ही टुम्ब्सने आपल्या जन्माच्या वेळी आईची प्रसुती करणाऱ्या तसंच आई गरोदरपणात ज्या डॉक्टरकडे उपचार घेत होती त्या डॉक्टरविरोधात न्यायालयात दाद मागितली. मला जन्माला का घातलं? असा सवाल या मुलीने उपस्थित केला आहे. या मुलीला स्पाईना बिफिडा या मणक्यातल्या बिघाडामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. इव्हीचा दावा आहे की, जर तिच्या आईच्या डॉक्टरने आईला वेळीच योग्य सल्ला दिला असता तर तिचा जन्म झाला नसता.

तिने असा दावा केला की जर तिच्या आईचे डॉक्टर फिलिप मिशेल यांनी तिच्या आईला फॉलिक अॅसिड सप्लिमेंट्स घेण्याचा सल्ला दिला असता ज्यामुळे बाळाच्या पाठीच्या कण्यातील दोषाचा धोका कमी झाला असता, तर तिची गर्भधारणा होण्यास उशीर झाला असता आणि इव्हीचा जन्म झाला नसता.

न्यायाधीश रोसालिंड को क्यूसी यांनी इव्हीच्या केसचे समर्थन केले आणि लंडन उच्च न्यायालयातील महत्त्वपूर्ण निकालात असे म्हटले की तिच्या आईला योग्य सल्ला दिला असता तर तिने गर्भधारणा टाळली असती. अशा परिस्थितीत, नंतर गर्भधारणा झाली असती, ज्यामुळे एक सामान्य निरोगी मूल जन्माला आले असते,” नुकसान भरपाई मिळवण्याचा इव्हीचा हक्क स्पष्ट करत न्यायाधीशांनी आपला निर्णय सुनावला. तिला प्रकरणात कोट्यवधी रुपयांची नुकसान भरपाईसुद्धा मिळाली आहे.

“मला सल्ला देण्यात आला होता की जर मी पूर्वी चांगला आहार घेतला तर मला फॉलिक अॅसिड घेण्याची गरज नाही,” एव्हीच्या दाव्याला पाठिंबा देत इव्हीच्या आईने न्यायालयात सांगितले.

Post a Comment

0 Comments