देशात 'ओमीक्रॉन 'चा एकही रुग्ण नाही

देशात 'ओमीक्रॉन 'चा एकही रुग्ण नाही 

वेब टीम नवी दिल्ली : अनेक देशांमध्ये करोनाच्या ओमीक्रॉन या उत्परिवर्तित विषाणूने डोके वर काढले आहे. मात्र, भारतात या विषाणूची लागण झालेला एकही रुग्ण आढळलेला नाही, असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी मंगळवारी संसदेत सांगितले. ओमीक्रॉन  विषाणू प्रतिबंधासाठी केंद्र सरकारकडून कठोर पावले उचलण्यात आल्याचेही मंडाविया यांनी स्पष्ट केले.

राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात आरोग्यमंत्र्यांनी ओमीक्रॉन विषाणूबाबत माहिती दिली. ‘‘सध्या १४ देशांमध्ये ओमीक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. मात्र भारतात अद्याप एकही रुग्ण आढळला नाही. देशातील सर्व विमानतळांवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून काही संशयित रुग्णांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात येत आहेत,’’ असे मंडाविया यांनी सांगितले.

 राज्यातही  करोना रुग्णआलेखाची घसरण कायम आहे. राज्यात गेल्या २४ तासांत करोनाचे ६७८ रुग्ण आढळले, तर ३५ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात मुंबई १८०, पुणे जिल्हा २०३, ठाणे जिल्हा ७४, नगर जिल्हा ४९ रुग्ण आढळले. राज्यात सध्या ७,५५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Post a Comment

0 Comments