भंडारदरा धरणाच्या सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक उपाय

भंडारदरा धरणाच्या सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक उपाय

वेब टीम नगर : अकोले तालुक्यातील ब्रिटीशकालीन धरण म्हणुन ख्याती असणा-या भंडारदरा धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असुन गुप्तचर विभागाने भंडारदरा धरणास सुरक्षेच्या कारणास्तव दिलेल्या भेटीच्या दरम्यान  धरणाच्या सुरक्षेच्या संदर्भात ताशेरे ओढले आहेत . त्यामुळे भंडारदरा धरण शाखेकडुन धरणावरुन जा - ये करणा-या स्थानिक नागरीक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ये - जा करण्यास बंदी घातली आहे.

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण हे ब्रिटीश कालीन धरण असुन या धरणास आता जवळ जवळ शंभर वर्ष पुर्ण होत आले आहेत .त्या दृष्टीने नुकतीच भंडारदरा धरणास उपविभागीय पोलिस अधिकारी संगमनेर , सहा . केंद्रीय आसुचना ब्युरो अहमदनगर , सहा.आयुक्त राज्य गुप्तवार्ता अहमदनगर , पोनि .जिविशा , सपोनि राजुर.पो .स्टेशन यांनी संयुक्तिक रित्या भंडारदरा धरण व धरण परीसरास भेट देऊन सुरक्षे संदर्भात भेट देऊन पाहणी केली.

पाहणी दरम्यान त्याना धरणाच्या भिंतीवरून   खाजगी व्यक्ती तसेच काॅलेजचे विद्यार्थी जाताना निदर्शनास आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली असुन धरणावरुन वाहनांनाही प्रवेश देऊ नये असे सक्त आदेश काढले आहेत.  तर धरणाच्या प्रवेशद्वारावर असणा-या अहमदनगर  पोलिसांच्या वतीने नेमणुकीस असलेल्या पोलिस कर्मचारी वर्गाची अपुरी संख्या या संदर्भातही महत्वाच्या सुचना दिल्या गेल्या आहेत. त्यानुसार भंडारदरा धरणावरुन कोणत्याही खाजगी व्यक्ती व काॅलेजच्या विद्यार्थ्यांना धरणावरुन ये -  जा करता येणार नसल्याचे धरण शाखेकडुन स्पष्ट करण्यात आले.

भंडारदरा धरणावरुन ये-जा करणारे स्थानिक नागरीक हे आसपासच्या गावातीलच स्थानिक रहिवासी असुन या लोकांसाठी धरणावरुन कायम स्वरुपी जाण्या येण्याचा मार्ग आहे . हे अंतर जवळ पडत असल्याने स्थानिक आसपासच्या गावातील नागरीकांना भंडारदरा धरणावरुन जाण्यास प्रतिबंध करण्यात येऊ नये अशी मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे. तसेच धरणाच्या दोन्हीही प्रवेशद्वारावरील सुरक्षा ही कुचकामी आहे .स्थानिक नागरीकापासुन धरणाच्या सुरक्षेस कोणताही धोका नसुन अगोदर प्रवेशद्वारावर असणारी सुरक्षा ही धरणशाखेने अधिक प्रबळ करावी असे मत धरणावरुन ये जा करणा-या व्यक्तींनी मांडले आहे .

Post a Comment

0 Comments