विद्यार्थ्यांचे औक्षण,पुष्पवृष्टी करुन शाळेत स्वागत

विद्यार्थ्यांचे औक्षण,पुष्पवृष्टी करुन शाळेत स्वागत

योगिता गांधी: विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबर आरोग्याबाबत काळजी घेणार

    वेब टीम  नगर : आज शाळेचा पहिला दिवस शिशु संगोपन संस्थेच्या सविता रमेश फिरोदिया प्रशालमध्ये इयत्ता 1 ली ते 4 थीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत औक्षण करुन फुगे फोडून, पुष्पवर्षाव करुन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापिका योगिता गांधी व सर्व शिक्षकवृंद, पालक विद्यार्थी उपस्थित होते.

     यावेळी मुख्याध्यापिका योगिता गांधी म्हणाल्या, गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शाळा बंद होती. शासनाने वेळोवेळी नियम करुन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडविण्यासाठी मार्गदर्शन करुन अभ्यासक्रम पूर्ण करुन घेण्यात येत होता. आता शासनाच्या निर्देशानुसार आता शाळा पुन्हा सुरु झाल्याने ब गेल्या  दोन दिवसांपासून सर्व वर्गांची स्वच्छता करुन, सॅनिटायझेशन केले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत काळजी घेण्यात आली आहे. यापुढेही विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्षांचा सर्व अभ्यासक्रम या कालावधीत पूर्ण करण्यास प्राधान्य राहील. जे विद्यार्थी शाळेत येवू शकत नाही, त्यांच्यासाठी ऑनलाईन सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे, त्यांनी सांगितले.

     यावेळी शाळेच्यावतीने सर्व पालकांकडून संमतीपत्र घेण्यात आले. तसेच विद्यार्थी-पालकांना मास्क बंधनकारक करण्यात आले होते. येणार्‍या प्रत्येकाचे तपामान चेक करुन प्रवेश देण्यात येत होता.

     यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिलीप गुंदेचा, उपाध्यक्ष दशरथ खोसे, सचिव र.धों.कासवा, सहसचिव राजेश झालानी, खजिनदार अ‍ॅड.विजयकुमार मुनोत आदिंसह विश्वस्त उपस्थित होते.(फोटो-डीएससी -००१७)

Post a Comment

0 Comments