भाजपाने जातीजातीत विष पेरण्याचे काम केले:डॉ .सुधीर तांबे

भाजपाने जातीजातीत विष पेरण्याचे काम केले:डॉ .सुधीर तांबे

वेब टीम देवळाली प्रवरा : काँग्रेसची विचारधारा सामान्य जनता व बहुजनांना न्याय देणारी आहे. ही विचारधारा घरो घरी पोचवण्यासाठी व कॉंग्रेसच्या बळकटीकरणासाठी तरुणांची फौज उभी करण्याचे काम ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी कार्य केले पाहिजे.

भाजपने महागाई वाढवली शेतकऱ्यांना आंदोलनाची वेळ आणली. धार्मिक मुद्द्यावर राजकारण करून जातीजातीमध्ये विष पेरण्याचे काम केले, असा आरोप आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केला.

देवळाली प्रवरा येथे काँग्रेस सभासद नोंदणी अभियान शुभारंभ व कार्यकर्ता मेळाव्यात ते बाेलत हाेते. आमदार लहू कानडे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, काँग्रेसचे समन्वयक ज्ञानदेव वाफारे, युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव करण ससाणे, शिर्डी संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, बाळासाहेब चव्हाण, अंकुश कानडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments