किरण गोसावीच्या कोठडीत वाढ

किरण गोसावीच्या कोठडीत वाढ 

वेब टीम मुंबई : मुंबईत क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणापासून सुरू झालेल्या नाट्याने वेगळंच वळण घेतलं आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेनंतर या प्रकरणात अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. यामध्येच आर्यनसोबतच्या सेल्फीमुळे चर्चेत आलेला किरण गोसावी याला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती. त्याच्या पोलीस कोठडीत आता वाढ कऱण्यात आली आहे.

आर्यन खानवरील कारवाईवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले असून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले. नवाब मलिक यांनी आरोपांना सुरुवात केली तेव्हा किरण गोसावी नावाचा उल्लेख केला होता. याशिवाय आर्यन खान सोबत सेल्फी काढल्यामुळेही तो चर्चेत होता. क्रूझवरील संपूर्ण कारवाईदरम्यान समीर वानखेडेंसोबत असणारा साक्षीदार किरण गोसावीला पुणे पोलिसांनी फसवणुकीच्या एका गुन्ह्याखाली अटक केली होती. दरम्यान, किरण गोसावीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ८ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. आता या कोठडीत वाढ करण्यात आली असून ८ नोव्हेंबरपर्यंत तो तुरुंगातच असणार आहे.

Post a Comment

0 Comments