शाळा सुरू करण्याबाबत 'चाईल्ड टास्क फोर्स' शी चर्चा करून निर्णय घेणार

शाळा सुरू करण्याबाबत 'चाईल्ड टास्क फोर्स' शी चर्चा करून निर्णय घेणार

वेब टीम मुंबई : ओमिक्रॉन व्हेरियंट  ने दक्षिण आफ्रिकेसह अनेक देशात चिंतेचे वातावरण निर्माण केले  आहे. डोंबिवली परिसरात देखील एका व्यक्तीला या व्हेरियंटची लागण झाली का  नाही याचा तपास सुरू आहे. ही व्यक्ती मागच्या बुधवारी दक्षिण आफ्रिकेमधील केपटाऊन  मधून मुंबईत दाखल झाला होता.

या नवीन ओमिक्रॉन व्हेरियंटने संपूर्ण जगात धुमाकूळ घालत आहे. याच या पार्श्वभूमीवर याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी आज मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलाविण्यात आली आहे . या बैठकीत ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर काही महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या धास्तीने शाळा सुरु करण्याचा निर्णय परत एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चाईल्ड फोर्सशी  चर्चा करणार आहेत. यानंतरच याविषयीचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

याअगोदर १ डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयावर आता फेरविचार होण्याची शक्यता आहे. आज मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करणे योग्य ठरेल का यावर चर्चा करण्यात येणार आहे. शाळा उघडण्याविषयी काही आव्हान आहेत.

यावर देखील यामध्ये चर्चा होणार आहे. शाळा सुरु करण्याबाबत चाईल्ड टास्क फोर्सशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजतं आहे. यामुळे सध्यातरी ‘वेट अँड वॉच’ची भूमीका घ्यावी असे या बैठकीत ठरल्याचे समजते  .

Post a Comment

0 Comments