“तुम्हीच लोकांना हे पुस्तक वाचू नका असं का सांगत नाही? :न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारलं

“तुम्हीच लोकांना हे पुस्तक वाचू नका असं का सांगत नाही? :न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारलं 

वेब टीम नवी दिल्ली : काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावरुन सुरु असलेला वाद अद्याप मिटलेला नाही. सलमान खुर्शीद यांनी आपलं पुस्तक ‘सनराईज ओव्हर अयोध्या ’ मध्ये हिंदुत्वाची तुलना आयसीस आणि बोको हराम या दहशतवादी संघटनांशी केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. या पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी अनेकांकडून केली जात आहे. दरम्यान अशीच मागणी करणारी एक याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली असून भावना दुखावत असतील तर लोक दुसरं काहीतरी चांगलं वाचू शकतात असं म्हटलं आहे.

कोर्टाने याचिकाकर्त्याला सांगितलं आहे की, “तुम्हीच लोकांना हे पुस्तक खरेदी करु नका किंवा वाचू नका असं का सांगत नाही? हे पुस्तक चांगलं नसून ते वाचू नका असं प्रत्येकाला सांगा. जर भावना दुखावल्या जात असतील तर ते इतर काहीतरी चांगलं वाचू शकतात”. याचिकाकर्त्याने हे पुस्तक भावना दुखावणारं असून त्यावर बंदी आणावी अशी मागणी केली होती.

हिंदुत्वाची आयसिस, बोको हरामशी तुलना; सलमान खुर्शिदांच्या नव्या पुस्तकावरून वाद

याचिकाकर्त्याने कोर्टात सांगितलं की, “”अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित नाही. कोणत्याही व्यक्तीला इतरांच्या भावनांचे उल्लंघन करण्याचा अधिकार नाही”. कोर्टाने यावेळी पुस्तकातील काही भाागावरुन वाद असून संपूर्ण पुस्तकावरुन नाही असं म्हटलं. “जर तुम्हाला प्रकाशकाचा परवानाच रद्द करायचा असेल तर वेगळी गोष्ट आहे. आमच्यासमोर संपूर्ण पुस्तक नाही तर त्यातला काही मजकूर आहे,” असं कोर्टाने यावेळी सांगितलं.

Post a Comment

0 Comments