विश्वास नांगरेंना पोलीस दलाच्या नोकरीतून मुक्त करा : किरीट सोमय्या

विश्वास  नांगरेंना पोलीस दलाच्या नोकरीतून मुक्त करा : किरीट सोमय्या

वेब टीम मुंबई : मुंबईचे पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या पत्नीवर गंभीर आरोप केलेत. तसेच विश्वास पाटील यांना पोलीस दलाच्या नोकरीतून मुक्त करा, अशी मागणी केलीय. ते पिंपरी चिंचवडमध्ये बोलत होते.

किरीट सोमय्या म्हणाले, “सध्या जालना साखर कारखान्याचे दोन मालक आहेत. एक खोतकर परिवार आणि दुसरे मुळे परिवार.त्यातल्या एक भागधारक रुपाली विश्वास पाटील या आहेत. विश्वास नांगरे पाटील हे मुबंई पोलीस दलाचे सह आयुक्त आहेत.

“शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना सांगू इच्छितो की जालना साखर कारखान्याची चौकशी स्टेटमेंट आल्यानंतर महिनाभरात बंद करण्यात आली. या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. नांगरे पाटील यांना नोकरीतून मुक्त केलं पाहिजे.”

“शरद पवार यांनी दिलेली धमकी ही अनिल देशमुख की अजित पवार यांच्यामुळे? देशमुखांवर प्रेम आहे की अजित पवार यांची काळजी आहे?” असा खोचक सवालही किरीट सोमय्या यांनी यावेळी केला.

ठाकरे सरकारने जनतेला लुटलं आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे दुप्पट रुग्ण मयत झाले आहेत. तेव्हा ठाकरे सरकार हे पैसे मोजत होते. घोटाळेबाजांना शिक्षा झाली पाहिजे, असंही किरीट सोमय्या यांनी सांगितलं.

Post a Comment

0 Comments