आंदोलनाचे तंबू बळजबरी हटविल्यास ..... राकेश टिकेत यांचा इशारा

आंदोलनाचे तंबू बळजबरी हटविल्यास ..... राकेश टिकेत यांचा इशारा 

वेब टीम नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरूच आहे. शेतकरी संघटना आपल्या मागण्यांवर ठाम असून, दिल्लीच्या सीमेवर त्यांनी ठिय्या दिलेला आहे. दरम्यान, आज शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी प्रशासनाला एक सूचक इशारा देखील दिला आहे.

“प्रशासन जेसीबीच्या सहाय्याने येथील तंबू हटवण्याचा प्रयत्न करत असल्याची आम्हाला माहिती मिळाले आहे. जर त्यांनी तसे केले तर शेतकरी पोलीस स्टेशन, डीएम कार्यालयात तंबू लावतील.”, असं राकेश टिकैत म्हणाले आहेत.

दिल्लीच्या गाझीपूर आणि टीकरी बॉर्डरवरून बॅरीकेड्स हटवण्याबाबत आणि मार्ग पूर्णपणे मोकळा करण्याबद्दल शेतकरी नेते आणि पोलीस प्रशासनातील वादाच्या पार्श्वभूमीवर राकेश टिकैत यांनी हा इशारा दिला आहे. टिकैत म्हणाले की, जर पोलीस प्रशासनाने शेतकऱ्यांना बळजबरी हटवले गेले तर आम्ही सरकारी कार्यालयांना धान्य बाजार बनवू.

Post a Comment

0 Comments