अर्बन बँक निवडणूक :सहकार पॅनेलची विजयी घोडदौड

अर्बन बँक निवडणूक :सहकार पॅनेलची विजयी घोडदौड 

वेब टीम नगर :  नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीचो मतमोजणी सुरू असून दुसऱ्या फेरीअखेर सहकार पॅनेलचे सर्व दहा उमेदवार यांनी विजयी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. शहरांमध्ये दहा जागांसाठी मतदान झाले होते. यासाठी सहकार पॅनलचे दहा तर इतर चार अपक्ष असे 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. सहकार पॅनलच्या अजय बोरा, अनिल कोठारी, ईश्वर बोरा, गिरिष लाहोटी, दीप्ती सुवेंद्र गांधी, महेंद्र गंधे, राजेंद्रकुमार अग्रवाल, राहुल जामगावकर, शैलेश मुनोत आणि संपतलाल बोरा या दहाही उमेदवारांनी जळपास दहा हजारांच्या वर मते दुसर्‍या फेरीत मिळवली असून इथेच विजयी आघाडी नक्की झाली आहे. 

तिसऱ्या फेरीत  ही आघाडी कायम असल्याची माहिती असून आता केवळ विजयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी असल्याचं एकूण चित्र आहे. यामुळे सहकार पॅनेलचे उमेदवार,समर्थक यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. शहरातील दहा जागांसाठी 17,771 एकूण मतदान झालेले आहे.

इतर चार अपक्ष उमेदवार ज्यामध्ये अनिल गट्टाणी, दीपक गुंदेचा, स्मिता पोखरणा, संजय धापसे या उमेदवारांना साधारण नऊशे ते दोन हजार या दरम्यान मते दुसऱ्या फेरी अखेर आहेत. शहरातील दहा जागांची मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील चार जागांसाठीची मतमोजणी सुरू होणार आहे.

Post a Comment

0 Comments