राहात्यातून वीस वर्षीय तरुणी बेपत्ता

 राहात्यातून वीस वर्षीय तरुणी बेपत्ता 

वेब टीम राहाता : किराणा दुकानात जाते असे सांगून घरातून बाहेर पडलेली एक 20 वर्षीय तरुणी राहात्यातून बेपत्ता झाली आहे. 

याप्रकरणी तरुणीचे  वडील  यांनी राहाता पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची खबर दिली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, बेपत्ता मुलगी  ही काल 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास त्यांच्या घरातून समोर असलेल्या एका किराणा दुकानात किराणा सामान आणण्यासाठी जाते, असे सांगून गेली.

ती परत आली नाही. बराच वेळ झाला तरी मुलगी घरी आली नाही म्हणून कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही. यामुळे मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठत बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली आहे.

मुलीचे वर्णन… रंग गोरा, उंची 5 फुट, शरिरबांधा सडपातळ, नाक सरळ, लांब केस, अंगात पिवळसर पंजाबी ड्रेस, पायात काळ्या रंगाचे सँडल, मराठी भाषा बोलते, असे तिचे वर्णन आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप तुपे हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments