..... तर त्या विरोधात हायकोर्टात दाद मागणार : गिरीश जाधव
वेब टीम नगर : अहमदनगर मधील जिल्हा त रुग्णालय जळीत कांड प्रकरणाचा अहवाल अजूनही समोर न आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिक प्रमाणे अहमदनगर मधील प्रकरण दडपण्याचा प्रशासन प्रयत्न करत आहे का असा आरोप या ठिकाणी होत आहे. या प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील पोखरणा यांना अटकपूर्व जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे आणि या विरोधात हायकोर्टात दाद मागणार असल्याचं शिवसेनेनं म्हंटलं तर दुसरीकडे या प्रकरणात प्रशासकीय अधिकारी सिव्हिल सर्जन तसेच पीडब्ल्यूडी चे इंजिनियर आणि ठेकेदार यांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही मनसेने केला आहे.
राज्य शासनाला सांगितले होते की आम्ही दहा दिवसात अहवाल देऊ , त्याला आता वीस बावीस दिवस झाले. त्यामध्ये कोणतीही प्रगती ही नाही . नाशिकच्या घटनेत सुद्धा असाच वेळ काढून पणा केला कोणावरही आरोप निश्चिती झाली नाही . इथेही असेच होण्याची चिन्हे आहेत . आता दोन दिवसांपूर्वी जिल्हा शल्य चिकित्सकां विरोधात कोणतेही पुरावे नसल्याचे उत्तर आय ओ ने कोर्टात दिले . त्यांच्या बाबतीत मग ही घटना घडली कशी गिरीश जाधव यांनी उपस्थित केला आहे.
सिव्हिल जळीत कांड प्रकरणांच्या अहवालामध्ये मोठा संशय आहे . आज तेवीस दिवस झाले तरी अहवाल प्रतीक्षेत आहे. आज खऱ्या अर्थाने सिव्हिल सर्जन सुनील पोखरणा यांना वाचवण्याचे काम किंवा पीडब्ल्यूडी अधिकारी यांना वाचवण्याचे काम यात होताना दिसते ,याला सर्वस्वी या राज्याचे आरोग्य मंत्री हे पाठीशी घालत आहेत आज पाहिले तर तेवीस तेवीस दिवस अहवाल बनवायला कशाला लागतात तुम्ही जर म्हणता शॉर्टसर्किटने आग लागली तर जो कोणी ठेकेदार होता ज्याने वायरिंग केली त्यापासूनच चौकशी ती दोन-तीन दिवसांची होती. ती जर पूर्ण नसेल तर यामध्ये काहीतरी काळंबेरं असल्याचे निलेश भुतारे यांनी म्हटले आहे .
0 Comments