"ओमिक्रोन "च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची बैठक

"ओमिक्रोन "च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची  बैठक 

वेब टीम नवी दिल्ली :  दक्षिण आफ्रिकेत करोना विषाणूचा नवा प्रकार B.1.1.529 समोर आला आहे आणि हा विषाणू लसीकरण झालेल्या व्यक्तिमध्ये तयार झालेली रोगप्रतिकारक शक्तीलाही भेदू शकतो अशी माहिती असल्यानं जगभरात चिंतेचे वातावरण पसरलं आहे. दक्षिण आफ्रिकेनंतर काही देशांमध्ये करोनाच्या नव्या विषाणूने बाधित रुग्ण आढळले आहेत. तर भारतात करोना बाधित लोकांचा दैनंदिन आकडा हा खाली आलेला आहे, सर्व व्यवहार, सुरळित सुरु झालेले आहेत, लसीकरण मोठ्या प्रमाणात झालं आहे, आंतरराष्ट्रीय विमान सेवाही पुन्हा सुरु करण्यात आली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा बैठक बोलवली आहे. या बैठकीत संबंधित केंद्रीय मंत्री, केंद्र सरकारचे अधिकारी आणि निवडक डॉक्टर सहभागी होणार आहेत. देशातील सध्याची करोनाची परिस्थिती, करोनाचा नवा विषाणू B.1.1.529 चा संभाव्य धोका आणि यामुळे करायच्या उपाययोजना यावर चर्चा केली जाणार आहे. तेव्हा या बैठकीनंतर करोनाच्या नव्या विषाणूचा सामना करण्यासाठी काही नव्या सुचना, नियम सांगितले जातात का हे बघणे महत्त्वाचे ठरेल.

Post a Comment

0 Comments