एसटीचे १० हजार कर्मचारी कामावर रुजू ; काही भागातील एसटी सुरू

एसटीचे १० हजार कर्मचारी कामावर रुजू ; काही भागातील एसटी सुरू 

वेब टीम नगर : राज्यपरिवहन मंत्र्याच्या  आवाहनाला प्रतिसाद देऊन १० हजार कर्मचारी कामावर  रुजू झाल्याचे चित्र आज पाहायला मिळालं नगर जिल्ह्यातील शेवगाव एसटी आगाराचे कर्मचारी व राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर शेवगाव येथील एसटी कामगारांनी संप मागे घेतला आहे.यामुळे शंभर टक्के बसेस पोलीस बंदोबस्तात मार्गावर सोडण्यात येणार आहे. संप मागे घेताच कर्मचारी कामावर हजर होण्यास सुरुवात झाली आहे.

१०० टक्के मार्गावरील बसेस आज पासून १८ दिवसांनंतर रस्त्यावर धावणार आहेत. 

सर्वसामान्यांची लालपरी सुरु झाल्याने प्रवाशी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले असून शाळकरी विद्यार्थ्यांचा शाळेत येण्या-जाण्यासाठीचा प्रवासाचा प्रश्न सुटला आहे.दरम्यान राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसंदर्भात ८ नोव्हेंबर पासून संप सुरु केला होता. शेवगाव आगारातील २५९ कर्मचारी संपावर गेल्याने एसटीचे चाक थांबले होते.तसेच बाहेर गावी जाणाऱ्या प्रवाशांचे व शाळकरी विद्यार्थ्यांचे अतोनात हाल सुरु होते. दरम्यान शुक्रवारी दुपारी विभाग नियंत्रक विजय गिते, विभागीय वाहतूक अधिकारी वासुदेव देवराज तसेच शेवगाव आगारातील कर्मचारी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे.

याबाबत एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप लबडे यांनी आम्हाला वाढून दिलेली पगार वाढ मान्य असून निलंबन आदेश मागे घेण्याचे तसेच ज्या कर्मचाऱ्यांना कामगिरी मिळणार नाही त्यांना हजेरी देण्याच्या अटीवर संप शेवगाव आगारापुरता मागे घेण्यात आला असल्याचे सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments