केंद्र सरकार “प्रत्येक क्षेत्रात नापास…” सुब्रहमण्यम स्वामी

केंद्र सरकार  “प्रत्येक क्षेत्रात नापास…” सुब्रहमण्यम स्वामी 

वेब टीम नवी दिल्ली : भाजपाचे खासदार सुब्रहमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला असून मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मोदी सरकार जवळपास प्रत्येक क्षेत्रात नापास झाल्याचं सुब्रहमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे सुब्रहमण्यम स्वामी यांनी काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. त्यांची भेट घेतल्यानंतर काही दिवसांतच त्यांनी हे विधान करत पक्षाला खडे बोल सुनावले आहेत.

मोदी सरकार अर्थव्यवस्था, सीमा सुरक्षेतही नापास झाल्याचं सुब्रहमण्यम स्वामी म्हणाले. तसंच अफगाणिस्तानमधील संकट भारत सरकारने ज्याप्रकारे हाताळलं ते गोंधळ निर्माण करणारं असल्याचं ते म्हणाले आहेत. याशिवाय पेगॅसस सुरक्षा त्रुटीसाठीही त्यांनी मोदी सरकारलाच जबाबदार धरल्याचं दिसत आहे. अंतर्गत सुरक्षेच्या मुद्द्यावरुन त्यांनी काश्मीरचं उदाहरण दिलं असून या सर्वांसाठी आपण जबाबदार असल्याचा टोलाही लगावला आहे.

दरम्यान बुधवारी स्वामींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई, राजीव गांधी, पी व्ही नरसिम्हा राव अशा दिग्गज नेत्यांशी तुलना केली. त्या जे बोलतात त्यामागे अर्थ असतो आणि अर्थाशिवाय त्या बोलत नाहीत असं सांगताना राजकारणात हा फार दुर्मिळ गुणधर्म असल्याचं ते म्हणाले होते.त्याच दिवशी त्यांनी मोदी सरकार हे मूर्खांनी भरलेलं असल्याचं टीका केली होती.

Post a Comment

0 Comments