पदासाठी हात पसरण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाहीत; पंकजा मुंडेंची जाहीर नाराजी

पदासाठी हात पसरण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाहीत; पंकजा मुंडेंची जाहीर नाराजी

वेब टीम बुलढाणा : एखाद्या गरीब फाटक्या माणसाच्या पायावर डोकं ठेऊन नतमस्तक होईल. पण कुठल्या पदासाठी हाथ फैलावून मागणी करण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाहीत, असे रोखठोक वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले. त्यांच्या या  वक्तव्यातून त्यांची जाहीर नाराजी देखील दिसून आली. बुलडाणा जिल्ह्यातील दुसरबीड येथे माजी आमदार तोताराम कायंदे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली.

यावेळी बोलताना मुंडे यांची पक्षाविषयी असलेली खंत व नाराजी पुन्हा एकदा जाहीर झाली आहे. नेमक्या काय म्हणाल्या पंकजा मुंडे ? जाणून घ्या पदासाठी कुणासमोर हात फैलावण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाहीत असं म्हणत त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना अप्रत्यक्षरीत्या टार्गेट केलं.

“माझं विश्व, माझे माता-पिता, माझं सर्वस्व जनता आहे. तुम्हाला दहा परिक्रमा करेल अजून कुठल्या प्ररिक्रमाची मला आवश्यकता नाही. एखाद्या गरीब फाटक्या माणसाला त्याच्या पायावर डोकं ठेऊन नतमस्तक होईल. पण कुठल्या पदासाठी हाथ फैलावून मागणी करण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाहीत,” असं थेट भाष्य पंकजा मुंडे यांनी केलं.

विधाना परिषदेसाठी उमेदवारीची अपेक्षा असतांनाही पदरी निराशा आल्याने पंकजा मुंडे या नाराज झाल्या आहेत त्यांच्या ऐवजी चंद्रशेखर बावन्नकुळे  यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. 


Post a Comment

0 Comments