काकी च्या प्रेमात पडला पुतण्या, संधी मिळताच दोघेही फरार...

काकीच्या प्रेमात पडला पुतण्या, संधी मिळताच दोघेही फरार... 

वेब टीम भरतपूर : राजस्थानच्या भरतपूर मध्ये  एक हैराण करणारी घटना समोर आली आहे.  इथे एक पुतण्या नुकतीच लग्न करून घरात आलेल्या काकीच्या प्रेमात पडला आणि दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू झालं . इतकंच नाही तर संधी मिळताच दोघेही घरातून फरार झाले . त्यानंतर पीडित काकाने आपल्या पुतण्या विरोधात त्याची पत्नी पळवून नेल्याची तक्रार दाखल केली आहे.

किसनपुर कॉलनीमध्ये एका तरुणाचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते, पण त्याच्या 19 वर्षीय पत्नी आणि त्याच्या 24 वर्षीय पुतण्यात प्रेम प्रकरण सुरू झालं . गेल्या 16 ऑक्टोबरला रात्री काकी आणि पुतण्या घरातून फरार झाले . त्या दोघांचाही शोध परिवार घेत आहे . पीडित व्यक्तीने सांगितले की 16 ऑक्टोबरला रात्री त्याची पत्नी आणि पुतण्या घरातून पळून गेले त्यांचा शोध घेतला जात आहे.  दोघांविरोधात पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे पीडिताने सांगितले की गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात प्रेम प्रकरण सुरू होतं दोघांना समजावून सांगण्याचा प्रयत्न झाला होता.  पण त्यांनी काही ऐकलं नाही आणि ते फरार झाले . या प्रकरणी पोलिसांनी सांगितलं की कमला नावाच्या महिलेने तक्रार दाखल केली आहे की तिची सून आणि तिचा नातू पळून गेले आहेत . दोघांचा अनेक ठिकाणी शोध घेतला पण त्यांचा काही पत्ता लागला नाही.  पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली असून लोकांचा शोध सुरू केला आहे.


Post a Comment

0 Comments