मुलीशी गैरवर्तन केले,न्यायालयाने आरोपीस ठोठावली सक्तमजुरी आणि दंड
वेब टीम नगर : अल्पवयीन मुलींचा पाठलाग करून त्यांच्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी आरोपी लक्ष्मीकांत नारायण ढगे (वय 41 रा. गुलमोहर रोड, नगर) याला न्यायालयाने 4 वर्षे सक्तमजुरी व सात हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
लक्ष्मीकांत ढगे असे आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, 15 एप्रिल 2017 रोजी नगर शहरातील एक अल्पवयीन मुलगी पेपर सुटल्यानंतर घरी येत असताना लक्ष्मीकांत ढगे याने मुलीजवळ येत, चौथीचे क्लास कुठे आहे, अशी चौकशी करत तिचा हात पकडून गैरवर्तन केले होते.
त्यावेळी फिर्यादी यांचा दूधवाला व काही ओळखीच्या इसमांनी सदरचा प्रकार पाहिला होता. फिर्यादीने ढगे याला याविषयी विचारले असता, ढगे याने घडलेल्या प्रकाराची कबुली दिली होती. त्यानंतर फिर्यादी, पीडित मुलगी व इतर काही इसम चाईल्ड लाईनच्या कार्यालयात गेले.
तेथे उपस्थित असलेल्या साथीदाराने त्याच्या अल्पवयीन मुलीसोबत ढगे याने गैरवर्तन केल्याचे सांगितले. यानंतर ढगे विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक के.दी. शिरदावडे यांनी करून आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
सदर खटल्याची सुनावणी विशेष जिल्हा न्यायाधीश श्रीमती एम व्ही देशपांडे यांच्यासमोर झाली खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील मोहन पी.कुलकर्णी यांनी काम पाहिले सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्यावतीने एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले
न्यायालयाने न्यायालयासमोर आलेल्या साक्षीपुरावे तसेच अतिरिक्त सरकारी वकील मोहन पी. कुलकर्णी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस शिक्षा ठोठावली आहे.
0 Comments