भारतात सहा महिन्यांत ५जी सेवा सुरू होणार!

भारतात सहा महिन्यांत ५जी सेवा सुरू होणार!

वेब टीम नवी दिल्ली : अवघ्या १० वर्षांत भारतात टूजीपासून आता थेट ५जीपर्यंतचा प्रवास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. कारण सध्या फोर-जी सेवा भारतात उपलब्ध असून लवकर भारतात ५जी सेवा देखील उपलब्ध होणार आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्ण यांनी यांदर्भात मोठी घोषणा केली असून त्यानुसार ५जी सेवेसाठीच्या कंत्राटांची लिलाव प्रक्रिया देखील लवकरच पार पाडली जाणार असल्याचं वैष्णव यांनी जाहीर केलं आङे. टाईम्स नाऊशी बोलताना वैष्णव यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.

अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या ६ महिन्यांमध्ये म्हणजेच, पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यापर्यंत देशभरात ५जी सेवा देण्यासाठीची लिलाव प्रक्रिया राबवली जाईल, असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे. “या लिलाव प्रक्रियेसाठीचे नियम आणि इतर बाबी ट्रायकडून निश्चित केल्या जातील. ही प्रक्रिया पुढील वर्षी मार्चपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर लगेचच ५जी साठीची लिलाव प्रक्रिया राबवली जाईल. तांत्रिकदृष्ट्या ही प्रक्रिया तटस्थ होण्यासाठी आम्ही आग्रही आहोत”, असं वैष्णव यांनी सांगितलं.

यावेळी बोलताना अश्विनी वैष्णव यांनी पुढील २-३ वर्षांमध्ये टेलिकॉम विश्वात मोठे बदल होण्याचे संकेत दिले. “येत्या २ ते ३ वर्षांमध्ये टेलिकॉम विश्वातील नियमांमध्ये पूर्णपणे बदल होणार असून ते जागतिक स्तरावरील मानकांनुसार असतील”, असं ते म्हणाले. तसेच, टेलिकॉम क्षेत्राविषयी केंद्र सरकारचा दृष्टीकोन अमूलाग्ररीत्या बदलल्याचं देखील वैष्णव यांनी नमूद केलं. “जागतिक दर्जाची टेलिकॉम व्यवस्था भारातात असावी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न पूर्ण केलं जाईल”, असं देखील ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments