विराट कोहलीच्या मुलीला बलात्काराची धमकी देणारा अटकेत , आरोपी सॉफ्टवेअर इंजिनीअर

विराट कोहलीच्या मुलीला बलात्काराची धमकी देणारा अटकेत , आरोपी सॉफ्टवेअर इंजिनीअर 

वेब टीम मुंबई : भारताचा महान क्रिकेटपटू विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या आयटी सेलने हैदराबाद येथून २३ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. त्याला मुंबईत आणले जात आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव रामनागेश अलीबथिनी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे, त्याने आयआयटी हैदराबादमधून बीटेक केले आहे आणि फूड डिलिव्हरी अॅपसाठी काम करतो.

कधी दिली होती धमकी?

टी-20 विश्वचषकात भारताला सलग पराभवाला सामोरे जावे लागले. पाकिस्तानपाठोपाठ टीम इंडियालाही न्यूझीलंडकडून सामना गमवावा लागला. यानंतर खेळाडू टीकाकारांच्या निशाण्यावर आले. सोशल मीडियावर काही लोकांनी विरोधाची सीमा ओलांडली आणि विराटच्या मुलीला धमक्या देण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपींनी कोहलीची मुलगी वामिकासाठी अपशब्द वापरले आणि बलात्काराची धमकी दिल्याचे सांगण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments