कंत्राटी कामगारांच्या भरवश्यावर 'सिव्हिल 'चा कारभार

कंत्राटी कामगारांच्या भरवश्यावर 'सिव्हिल 'चा कारभार 

वेब टीम नगर : जिल्हा रुग्णालयातील covid-19 वॉर्ड मध्ये शनिवारी सकाळी लागलेल्या आगीमध्ये ११ रुग्णांचा मृत्यू झाला यानंतर आता एक एक धक्कादायक गोष्ट समोर येऊ लागल्या आहेत

ही आग कशामुळे लागली याबाबतचे चित्रीकरण सीसीटीव्ही फुटेजमध्ये झाले असले तरी जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता.

त्यानंतर हा जो महत्त्वाचा वॉर्ड आहे याठिकाणी फक्त एकच महिला कर्मचारी उपस्थित असल्याचं दिसून येत आहे तर काही रुग्णांच्या नातेवाईकांनी आपल्या पेशंटला बांधून ठेवले असल्यामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही व ते तडफडून मेले असाही आरोप केला आहे. ज्या महिला कर्मचाऱ्यांची याठिकाणी शनिवारी नियुक्ती होती ती महिला कर्मचारी आलीच नसल्याचं उघड झाले आहे. कंत्राटी कामगारांच्या भरोश्यावर सध्या जिल्हा रुग्णालय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Post a Comment

0 Comments