जिल्हा रुग्णालय अग्नितांडव तपास संदीप मिटके यांच्याकडे !

जिल्हा रुग्णालय अग्नितांडव तपास संदीप मिटके यांच्याकडे !

वेब टीम नगर : अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथील कोविड अतिदक्षता विभागाला (ICU) शनिवारी लागलेल्या आगीमध्ये 11 रुग्ण मयत झाले असून तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा हा पोलिसांनी फिर्याद दिल्यावर च शनिवारी दाखल करण्यात आला आहे

गुन्ह्यांचे गांभीर्य, संवेदनशीलता व व्याप्ती पाहता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक यांनी पोलीस उपअधीक्षक  संदीप मिटके , श्रीरामपूर विभाग ( अतिरिक्त कार्यभार – अहमदनगर शहर विभाग ) यांचे कडे वर्ग केला आहे.

घटनास्थळी अद्यापपावेतो केंद्रीय आरोग्य मंत्री महा राज्य आरोग्य मंत्री राजेश टोपे पालकमंत्री  हसन मुश्रीफ महसूल मंत्री  बाळासाहेब थोरात जलसंपदा मंत्री  जयंत पाटील नगरविकास , ऊर्जा , आदिवासी विकास , आपत्ती व्यस्थापन , मदत व पुनर्वसन मंत्री  प्राजक्त तनपुरे मृदा व जलसंधारण मंत्रीशंकरराव गडाख विभागीय आयुक्त नाशिक राधाकृष्ण गमे पोलीस उपमहानिरीक्षक बी जी शेखर ,अहमदनगर जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले पोलीस अधीक्षक मनोज पाटील अपर पोलीस अधीक्षक  सौरभ अगरवाल खासदार  सुजय विखे ,  सदाशिव लोखंडे आमदार निलम गोऱ्हे , संग्राम जगताप ,  सत्यजित तांबे ,  लहू कानडे ,  रोहित पवार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पोखरणा जिल्हा परिषद अध्यक्षा  राजश्रीताई घुले , महावितरण सचिव व कमिटी विभागीय आयुक्त कमिटी आदींनी भेटी दिल्या आहेत.

पुढील तपास पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली Dy S P संदीप मिटके हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments