“…तर डोळे फोडून हात कापून टाकू;” भाजपा खासदाराचा काँग्रेस नेत्यांना इशारा

“…तर डोळे फोडून हात कापून टाकू;” भाजपा खासदाराचा काँग्रेस नेत्यांना इशारा

भाजपा खासदाराने काँग्रेस नेत्यांना धमकावलं आहे

वेब टीम चंदीगड : जर कोणीही हरियाणाचे माजी मंत्री मनीष ग्रोव्हर यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे डोळे फोढून हात कापून टाकू, अशी धमकी भाजपा खासदार अरविंद शर्मा यांनी शनिवारी दिली. हरियाणातील रोहतक येथील एका मंदिरात ग्रोव्हरसह भाजपाच्या काही नेत्यांना ओलीस ठेवण्यात आल्यानंतर शर्मा यांनी धमकावलं आहे. तसेच शुक्रवारी झालेल्या घटनेला त्यांनी काँग्रेसला जबाबदार धरले. भाजपाने शनिवारी रोहतकमध्ये काँग्रेसविरोधात आंदोलन देखील केले. शेतकरी आणि गावकऱ्यांनी आंदोलन केल्यामुळे मनीष ग्रोवर आणि इतर अनेक भाजपा नेते शुक्रवारी हरियाणाच्या रोहतकमधील एका मंदिराच्या संकुलात काही तास बंदिस्त होते.

“काँग्रेस आणि पक्षाचे नेते भूपिंदर सिंग हुड्डा आणि त्यांचा मुलगा दीपेंद्र हुडा ग्रोवर यांना लक्ष्य करत आहे. दीपेंद्र हुड्डा यांना ग्रोवरमुळे लोकसभेत पराभव स्वीकारावा लागला, त्यामुळे ते टीका करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मनीष ग्रोवरमुळे आम्ही रोहतक लोकसभा जागा जिंकली यात शंका नाही,” असं शर्मा म्हणाले.

काँग्रेस पक्षाचे नेते दीपेंद्र हुड्डा यांना इशारा देताना शर्मा म्हणाले, “जर मनीष ग्रोवरकडे कोणी डोळे वर करून पाहिलं तर, डोळे काढून टाकले जाईल, जर कोणी हात उचलला तर तो हात आम्ही कापून टाकू, आम्ही कुणालाही सोडणार नाही.”


Post a Comment

0 Comments