"काढा तण - वाचवा वन या ऐतिहासिक अभियानास" अहमदनगर जिल्ह्यात सुरूवात

"काढा तण - वाचवा वन या ऐतिहासिक अभियानास" अहमदनगर जिल्ह्यात सुरूवात



वेब टीम नगर : अहमदनगर जिल्हा निसर्गप्रेमी तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन समुह तसेच वनविभाग अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित काढा तण - वाचवा वन या अभियानास करंजी,ता-पाथर्डी येथुन नुकतीच सुरूवात करण्यात आली.

 जिल्ह्यातील गर्भगीरी डोंगररांगांत करंजी घाट(ता-पाथर्डी) या ठिकाणाहुन काॅसमाॅस व टिथोनिया अर्थात मेक्सीकन सुर्यफुल या सुंदर दिसणार्‍या परंतु विदेशी घातक तण वनस्पतींची झपाट्याने वाढ सुरू झाल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांचे समुळ उच्चाटन करून गर्भगीरी डोंगररांगांची जैवविविधता अबाधित राखण्याच्या उद्देशाने ही मोहिम हाती घेण्यात आली होती.अहमदनगरजिल्ह्यात वनांची वैविध्यपुर्णता टिकवण्यासाठी हाती घेतलेली ही पहिलीच मोहीम असुन यात वनविभाग व निसर्गप्रेमींचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

या विदेशी तण वनस्पती अल्पावधीत झपाट्याने पसरतात तसेच येथील  स्थानिक व उपयोगी,औषधी वनस्पतींच्या जागा बळकावुन त्यांचे आस्तित्व संपुष्टात आणतात. जनावरांच्या व वन्यप्राण्यांच्या  चार्‍यासाठी उपयोगी असणारे गवताळ कुरणांची जागा व्यापुन टाकतात,त्यामुळे चरावु क्षेञ कमी होते. ज्या ठिकाणी  या वनस्पती वाढतात तेथील नैसर्गीक अन्नसाखळ्यांची मोठ्या प्रमाणावर हानी होते परिणामी तिथल्या मुळ वन्यपशु,पक्षी,किटक,वनस्पती यांची संख्या झपाट्याने घटु लागते.हळुहळु हे तण नजीकच्या शेतांमध्ये शिरून शेतकर्‍यांनाही हैराण करते.काॅग्रेस गवतापेक्षा भयावह असलेल्या या वनस्पती अत्यंत कमी पाण्यावर वाढतात.या वनस्पतींना जनावरे अथवा इतर प्राणी खात नाहीत अथवा या वनस्पतींवर वाढणारी किड आपल्या देशात आस्तित्वात नाही.या विदेशी तण वनस्पतींमुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात धोके निर्माण होवु शकतात.थोडक्यात या वनस्पतीचे दुष्परिणाम एखाद्या वनव्यापेक्षाही भयावह आहेत.या वनस्पतींचे वेळीच निमुर्लन केले तरच अहमदनगर जिल्ह्याचे वैभव असणार्‍या गर्भगिरीची जैवविविधता अबाधित राहील.

या एकदिवसीय तणनिर्मुलन  उपक्रमासाठी जिल्हा उपवनसंरक्षक अधिकारी मा.सुवर्णा माने यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

या  मोहिमेबाबत संदिप राठोड,जयराम सातपुते.अमित गायकवाड,राजेश काळे,छानराज क्षेञे आदिंनी मार्गदर्शन केले तर निसर्गकवी सचिन चव्हाण सर यांनी विदेशी तण व पर्यावरणसंवर्धन यावर आपल्या कवितांद्वारे सादरीकरण केले.वनविभागाच्या एकनाथ खेडकर,अदिनाथ पिसे,कविता दहिफळे, ज्योती शिरसाट छगनराव क्षेञे आदींसह निसर्गप्रेमी समुहातीलविकास सातपुते, स्वराज खुडे,चिन्मय काळे,श्री.सचिन अकोलकर,तन्वी अकोलकर,रोहित अकोलकर आदींनी मोहिमेत श्रमदान केले.या मोहिमेमध्ये जमा झालेले एक टॅम्पो तण नियोजनबद्धपणे वाळवुन,ते जाळुन समुळ नष्ट केले जाणार आहे.

अशी माहीती निसर्गअभ्यासक जयराम सातपुते यांनी दिली.

Post a Comment

0 Comments