मुख्याध्यापिका अनिता काळे यांचा 'घरोघरी शाळा' उपक्रम कौतुकास्पद : महापौर रोहिणी शेंडगे
वेब टीम नगर : जि.प.प्राथमिक शाळा भिस्तबाग, केंद्र वडगांव गुप्ता येथील मुख्याध्यापिका अनिता काळे यांनी 'घरोघरी शाळा' या उपक्रमाचे नियोजन केले. अहमदनगर शहराच्या महापौर रोहिणी शेंडगे, शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील , यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती गटशिक्षणाधिकारी . रवींद्र कापरे , प्रशासन अधिकारी म. न. पा. शिक्षण अधिकारी सुभाष पवार ,मा.नगरसेविका शारदा ताई ढवण, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुरेश इथापे ,मा. केंद्र प्रमुख वडगांव गुप्ता दिलीपजी दहिफळे , म. न. पा. शिक्षण मंडळाचे पर्यवेक्षक जुबेर पठाण सर, केंद्र समन्वय नागपूर नरवडे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोरोना काळात ख-या अर्थाने विदयार्थ्यांना नवसंजीवनी असल्याचे मत शिक्षण अधिकारी भास्कर पाटील यांनी व्यक्त केले. कोरोना च्या संकटामुळे मागील दीड वर्षापासुन शाळा बंद असल्याने शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. पंरतु भिस्तबाग शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता लक्ष्मण काळे व सहकारी शिक्षिका सुरेखा वाघ, शितल आवारे यांच्या सहकार्याने प्रत्येक विदयार्थ्यांच्या घरी जाऊन तक्ते बनवून स्वतंत्र शाळा तयार करून विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंडितपणे सुरू ठेवले आहे.
महापौर रोहिणी शेंडगे बोलताना म्हणाल्या की, राष्ट्राची खरी गरज असेल तर सुजान नागरिक तयार होणे. यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची खरी आवश्यकता आहे. त्यादृष्टीनेअनिता लक्ष्मण काळे यांनी अथक परिश्रमाने विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू ठेवले. इतर शाळांनी हा उपक्रम राबविला पाहिजे.
'घरोघरी शाळा' उपक्रमाचे प्रणेते संजय खरात यांनी या उद्घाटन सोहळयास ऑनलाईन उपस्थित राहून उपक्रमा विषयी माहिती सांगितली.
या कार्यक्रमात कु.निष्ठा हंसराज सुपेकर हिने हिच आमुची प्रार्थना व ऐगिरी नंदिनी हि गीते हार्मोनियम वर गायली व सर्वांचे मन भारावून टाकले.
शिक्षण अधिकारी पाटील यांनी स्तुत्य उपक्रम म्हणून विशेष उल्लेख केला. सर्व पदाधिकाऱ्यानी उपक्रमास शुभेच्छा दिल्या.विशेष सहकार्य मनिषा कदम, बनकर मॅडम, गर्जेमॅडम यांचे लाभले.
0 Comments