दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने सत्तर वर्षीय वृद्धाची हत्या

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने सत्तर वर्षीय वृद्धाची हत्या 

वेब टीम नगर : दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता ते न दिल्याचा राग आल्यामुळे त्यातून झालेल्या वादात एका सत्तर वर्षीय वृद्धाची हत्या झाल्याची घटना काल दि १८ सोमवार रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा शहरात घडली आहे.

बापु विष्णु ओहळ, वय ७० वर्षे, मुळ रा. पिसोरेखांड, ता. श्रीगोंदा हल्ली रा. लिपणगाव, ता. श्रीगोंदा,असे या वादात मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे तर सुनील तात्याराव ससाणे वय ४० रा घुगलवडगाव असे या मारहाणीत जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सदर घटनेबाबत सुनील भागचंद घोडके यांच्या फिर्यादीवरून आरोपी नामदेव सुनील भोसले उर्फ लंगड्या रा मांडवगण याच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आज पहाटे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी रात्रीच शोध मोहीम राबवत आरोपी अटक केला आहे. 

काल रात्री यातील आरोपीने मयत ओहळ यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले त्यातून झालेल्या वादात आरोपीने मयत ओहोळ यांच्या नाका-तोंडावर हाताने ठोसे मारुन जखमी केले व गळ्याला कपड्याने आवळुन खुन करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांना फरफटत नेऊन श्रीगोंदा नगर परीषदचे बंद गाळ्याचे बाजुला लेंडी नाल्याजवळ झुड़पामध्ये नेवुन टाकले,या घटनेचा पुढील तपास सहायक पो निरीक्षक दिलीप तेजनकर हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments