अत्याचाराविरोधात कठोर कारवाई न केल्यास समस्त हिंदू समाज रस्त्यावर उतरेल : डॉ.मिलींद मोभारकर
वेब टीम नगर: नगर शहरातील हिंदू समाजातील अध्यात्मिक गुरु राजाभाऊ कोठारी यांच्यावर झेंडीगेट परिसरात काही मुस्लीम समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक रहदारीस अडथळा निर्माण करून व त्यावरून भांडण उकरून काढून प्राणघातक हल्ला केल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे.तसेच नालेगाव वाघ गल्ली भागातील अवघ्या14 वर्षीय मुलीने लव जिहाद या त्रासाला कंटाळून विष प्राशन करून आपली जीवन यात्रा संपविली. मुलीच्या अत्याचाराची तक्रार देण्यासाठी आलेल्या मातेला कोतवाली पोलिस स्टेशन मध्ये तक्रार घेण्यासाठी चार तास ताटकळत बसावे लागले. कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये प्रशासनाने केलेल्या दिरंगाईमुळे हिंदू समाजाच्या भावनांचा उद्रेक झाला.पोलीस स्टेशन मध्ये आलेल्या हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला.या संदर्भात पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी तात्काळ गुन्हे मागे घ्यावेत.अशी मागणी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे.
हुक्का पार्लरच्या माध्यमातून ड्रग्ज जिहादचे षड्यंत्र मुस्लिम समाजातील जिहादी लोकांनी मोठ्या प्रमाणात सुरू केले आहे.यासर्व बाबतीत राज्य सरकार,शासन व प्रशासन हे गंभीर भूमिका घेत नसल्याचे वास्तव चित्र आहे.
पालघर येथील हिंदू साधुसंतांच्या हत्या या घटनेपासून ते नगर शहरातील,जिल्ह्यातील व राज्यातील समस्त हिंदू समाजाचे श्रद्धेय अध्यात्मिक गुरु राजाभाऊ कोठारी महाराज यांच्यावर मुस्लिम समाजातील समाजकंटकांकडून नुकत्याच झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे व नगर शहरात वाढत असलेल्या लव्ह जिहाद या प्रकरणांमुळे हिंदू समाजाच्या भावना अत्यंत तीव्र व संतप्त झालेले आहेत.राज्य सरकारने पोलीस प्रशासनाने यासंदर्भात कठोर पावले उचलून कारवाई करावी.अन्यथा विश्वहिंदू परिषद,बजरंग दल तसेच समस्त हिंदू समाज रस्त्यावर उतरून सनदशीर मार्गाने याचा प्रतिकार करेल.असा इशारा पञकार परिषदेत बोलताना विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत धर्मप्रसार प्रमुख डॉ. मिलिंद मोभारकर यांनी दिला.
नगरमध्ये समाजकंटकांनी धर्मगुरुंवर केलेला भ्याड हल्ला तसेच लव्ह जिहाद यासंदर्भात विश्वहिंदू परिषद व बजरंग दलातर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी विश्वहिंदू परिषदेचे प्रांत धर्मप्रसार प्रमुख डॉ.मिलिंद मोभारकर,जिल्हा कोषाध्यक्ष मुकुल गंधे,जिल्हामंत्री गजेंद्र सोनवणे,जिल्हा सहमंत्री गौतम कराळे,बजरंगदल शहर संयोजक कुणाल भंडारी,शहरमंत्री श्रीकांत नांदापूरकर आदी उपस्थित होते.
0 Comments