खुषखबर! PF वर मिळणार ८.५ टक्के व्याज

खुषखबर! PF वर मिळणार ८.५ टक्के व्याज

वेब टीम नवीदिल्ली : २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी भविष्य निर्वाह निधी खातेधारकांना मिळणारे व्याज निश्चित करण्याबाबत अर्थ मंत्रालयाने कामगार मंत्रालयाचा प्रस्ताव स्वीकारला आहे. मंत्रालयाच्या मंजुरीनंतर पीफ ठेवीवर खातेधारकांना ८.५ टक्के व्याज दिले जाईल. याचा फायदा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सहा कोटींहून अधिक खातेदारांना होणार आहे. गेल्या वेळी २०१९-२० या आर्थिक वर्षात, KYC गडबडीमुळे अनेक ग्राहकांना व्याज मिळविण्यासाठी ८ ते १० महिन्यांचा दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली होती.

कामगार सचिव सुनील बर्थवाल यांनी इकॉनॉमिक टाईम्सला सांगितले की, “हे दिवाळीच्या भेटीसारखे आहे. लवकरच हा आदेश अधिसूचित करण्यात येणार आहे. सेवानिवृत्ती निधीचे व्यवस्थापन करणारी ईपीएफओ कामगार मंत्रालयाच्या अंतर्गत येते, हे उल्लेखनीय आहे.”

या वर्षी EPFO ​​च्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही, तो तसाच ठेवण्यात आला आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे. तसेच कोविड महामारीमुळे गेल्या एका वर्षात EPFO ​​मध्ये योगदानापेक्षा जास्त पैसे काढले गेले आहेत. मार्च २०२० मध्ये पीएफवरील व्याजदर ८.६५ टक्क्यांवरून ८.५ टक्के करण्यात आला. सात वर्षांतील हा सर्वात कमी व्याजदर आहे. २०१२-१३ मध्ये पीएफवर याच दराने व्याज देण्यात आले होते.

घरी बसून चेक करा व्याजाची रक्कम

तुमच्या पीएफ खात्यात व्याजाचे पैसे आले आहेत की नाही हे देखील तुम्ही पाहू शकता. जर तुमच्या खात्यात व्याजाची रक्कम आली नसेल तर तुम्ही त्याबद्दल तक्रार देखील करू शकता. व्याजाची रक्कम पाहण्यासाठी तुम्हाला epfigms.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

येथे तुम्हाला Register Grievance चा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक केल्यानंतर, तुम्ही तुमच्या प्रोफाइलमधून  पीएफ मेंबर, ईपीएफ पेंशनर, एम्प्लायर, यापैकी तुमचा पर्याय निवडू शकता. तक्रारीसाठी तुम्हाला ‘पीएफ मेंबर’  निवड करावी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही तुमचा UAN क्रमांक आणि पासवर्ड टाकून वैयक्तिक माहिती मिळवू शकता. 

Post a Comment

0 Comments